भारत माझा देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशाने आज जगात ओळख निर्माण केली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारताचे वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह आहेत.
भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. तर प्रत्येक राज्यात वेगळी संस्कृती आहे अनेक जाती धर्माचे लोक भारतात एकत्र राहतात पण एकमेकांबद्दल सर्व आदराने वागतात जात धर्म कधीच अडथळा बनत नाही.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे तर राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. बेंगोल टायगर हे भारतातील विशेष आकर्षण आहे.
भारताचा झेंडा हा तीन रंगांचा आहे केशरी, पांढरा आणि हिरवा आणि मध्ये अशोक चक्र आहे ज्याला २४ आऱ्या असतात. जे निळ्या रंगाचे आहे. प्रत्येक रंगामधून संदेश दिला जातो भारताचे राष्ट्रगीत जन गण मन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले तर वंदे मातरम् बकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे.
भारतात अनेक संत, नेते होऊन गेले सर्वांनी देशासाठी खूप योगदान दिले काहींनी पूर्ण आयुष्य पणाला लावले तर काहींनी देशासाठी जीवही दिला. महात्मा गांधी,डॉ. बाबासाहेब आबेडकर,भगतसिंग , सुभाषचंद्र बोस इत्यादी या सर्वांचे भारताला विशेष योगदान दिलेले आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले स्वतंत्र दिवस हा भारतात खूप आनंदाने साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी योगदान दिले आहे या नेत्यांच्या कामगिरीमुळे त्यांचे जगभरात नाव आहे आणि त्यांच्या मुळेच भारत देशाचेही नाव आहे
भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना पाहण्यासाठी विदेशातून लोक येथे गर्दी करतात. ताजमहाल जगभरात प्रसिद्ध आहे तसेच अजिंठा लेणी, अजून अनेक लेण्या, खजूराह, अनेक प्राचीन मंदिर, यांची प्रसिद्धी जगभरात आहे. भारतीय मंदिरे ज्या विशिष्ठ शैलीने बांधली गेली आहेत याचे कौतुक करावेसे वाटते.
भारत हा जगात ७०% मिरचीचे उत्पादन करणारा देश आहे, तसेच भारताला कृषीप्रधान देश म्हणूनही ओळखले जाते . भारतात अनेक पिकांचे उत्पादन होते जसे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भात, केळी, कापूस, ऊस इत्यादी
भारतामध्ये सध्या जगातील सर्वात उंच पुतळा आहे जो गुजरातमध्ये आहे . सरदार वल्लभाई पटेल यांचा हा पुतळा ६०० फूट उंच आहे.
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे पण गंमतीचा भाग असा आहे की भारतामध्ये क्रिकेटप्रेमी इतके आहेत की हॉकी हा खेळ क्वचितच पाहायला मिळतो.
भारत हा देश अध्यात्मिक देश म्हणूनही ओळखला जातो येथे गायीला गोमाता म्हणून संबोधतात. गायीला पवित्र मानले जाते कारण गाईमध्ये ३३ कोटी देवांचा वास आहे असे म्हटले जाते. भारतामध्ये तब्बल १५ लाखाहून जास्त मंदिर आहेत. योग आणि आयुर्वेद ही भेट भारतानेच जगाला दिली आहे जगात योग आणि आयुर्वेदाचे किती महत्व आहे हे तर सांगायलाच नको !
भारतामध्ये अनेक संस्कृतीचे लोक आहेत या विविधतेने नटलेल्या संस्कृतीला बाहेरील लोक खूप कुतूहलाने पाहतात. ही विविधता भारताला सुंदर बनवते
Majha desh marathi nibandh
Bharat desh marathi nibandh
Majha desh nibandh in marathi
Majha desh eassay