सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Sajivantil vividhata aani vargikaran swadhyay std 6th General Science digest

 



१. सांगा, मी कोणाशी जोड़ी लावू?


'क' गट


अ. उभयचर - बेडूक


आ. पृष्ठवंशीय - माकड


 इ. खवले असणारे - साप




२. आमच्यात वेगळा कोण?


अ. बुरशी, भूछत्र, शेवंती, स्पायरोगावरा 

उत्तर - शेवंती



आ. आंबा, वड, ताड, हरभरा 

उत्तर - ताड 



इ. द्राक्षे, संत्रे, लिंबू, जास्वंद 

उत्तर - जास्वंद



ई. सूर्यफूल, बड, ज्वारी, बाजरी 

उत्तर - वड


उ. पेरू, मुळा, गाजर, बीट

उत्तर - पेरू


ऊ. हरीण, मासा, मानव, कृमी.

उत्तर - मासा 


३. आमच्यात फरक काय आहे?


अ. सपुष्प वनस्पती अपुष्प वनस्पती

सपुष्प वनस्पती

१. सपुष्प वनस्पतींना फुले येतात.

२. सपुष्प वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे अवयव असतात.

३. सपुष्प वनस्पती जास्त विकसित असतात.

४. सपुष्प वनस्पतींना बिया असलेली फळे येतात.


अपुष्प वनस्पती

१. अपुष्प वनस्पतींना फुले येत नाहीत.

२. अपुष्प वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे अवयव असतीलच असे नाही.

३. अपुष्प वनस्पती विकसित नसतात.

४. अपुष्प वनस्पतींना येत नाहीत.


आ. वृक्ष झुडूप


वृक्ष

१. वृक्ष अतिशय उंच वाढतात.

२. वृक्ष आकाराने मोठे असतात.

३. वृक्ष बहुवार्षिक असतात.

४. वृक्षांना जमिनीपासून काही उंचीवर फांदया

फुटतात. उदा., आंबा, कडुलिंब.


झुडूप

१. झुडपे उंच वाढत नाहीत. 

२. झुडपे आकाराने लहान असतात.

३. बहुतेक झुडपे वार्षिक किंवा द्विवार्षिक असतात.

४. झुडपांना जमिनीलगतच फांदया फुटतात. उदा., कण्हेर, घाणेरी.



 इ. पृष्ठवंशीय प्राणी अपृष्ठवंशीय प्राणी


पृष्ठवंशीय प्राणी 

१. पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो.

२. पृष्ठवंशीय प्राणी जास्त विकसित असतात.

३. उदा., मासे, साप, पक्षी, बेडूक, मानव.


अपृष्ठवंशीय प्राणी


१. अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा नसतो.

२. अपृष्ठवंशीय प्राणी कमी विकसित असतात.

३. उदा., अमिबा, गोगलगाय, कीटक, गांडूळ.


सत्य की असत्य ओळखा

अ. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे.

उत्तर - असत्य


आ. उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात.

उत्तर - सत्य

इ. पृष्ठवंशीय प्राण्यांत मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते.

उत्तर - सत्य

ई. अमिधा हा बहुपेशीय प्राणी आहे.

उत्तर - सत्य


दोन नावे लिहा.


अ. सपुष्प वनस्पती

उत्तर - गुलाब , कमळ

आ. अपुष्प वनस्पती

उत्तर - शैवाळ , नेचे

इ. वृक्ष 

उत्तर - कडुलिंब , आंबा

ई. झुडूप

उत्तर - लिंबू, तुळशी

उ. वेल

उत्तर - अपराजिता, भोपळा


ऊ. वार्षिक वनस्पती

उत्तर - झेंडू, मका 


ए. द्विवार्षिक वनस्पती

उत्तर - कांदा, गाजर



६. खालील प्रश्नांची उत्तरे दया.


अ. वनस्पतीचे अवयव कोणते?

उत्तर - मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत.


आ. मुळांची कार्ये कोणती?

उत्तर -   माती घट्ट धरून ठेवते. वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषकतत्त्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्ये आहेत. गाजर, मुळा यांमध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते.



इ. सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे?

उत्तर   

१) सजीवांमध्ये त्यांच्या गुणधर्मानुसार खूप विविधता आहे

२) यामुळे वर्गीकरण केले असता त्यांच्या सर्वांना व्यवस्थित रीत्या अभ्यासता येते.



ई. सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात?

उत्तर 

१) रचना

२) अवयव

३) वैशिष्ट्ये

४) अधिवास

५) भेद व साम्य 


3. वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा.

उत्तर

१) काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात.


२)वेलींचे खोड हे अतिशय लवचीक, मऊ व हिरवे असते. 


३) त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते


ऊ. रोपट्याची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे दया..



१) रोपटी सुमारे १ ते १.५ मीटरपर्यंत उंच वाढतात.

२) रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडुपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. 

३) रोपटी काही महिने ते दोन वर्षे जगतात.




ए. प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल?


१) वनस्पतींचे खोडांचे आकार व उंचीनुसार, जीवनक्रम कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. 

२) प्राण्यांचे पेशीरचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते.


ऐ. प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते?

उत्तर

काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक आवरण असते. काहींच्या अंगावर खवले किंवा इतर अवयव असतात. काही प्राणी त्यांच्या वर्तणुकीतून स्वतःचे संरक्षण करून घेतात. काही प्राण्यांना संरक्षणासाठी खास अवयव निसर्गाने दिलेले असतात. उदा., शिंगे, नखे, तीक्ष्ण दात.

७. आकृत्या काढा.


वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, खोड, पाने हे भाग दाखवा.




Post a Comment

Previous Post Next Post