तारकांच्या दुनियेत स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Tarakanchya Duniyet swadhyay std 7th General Science solution

 



रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.


(मध्यमंडळ, क्षितिज, बारा, नऊ, भासमान,


वैषुविक, आयनिक)


अ. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्या सारखे  दिसते ........त्या रेषेला म्हणतात.

उत्तर - क्षितिज


आ. राशींची संकल्पना मांडताना......वृत्त विचारात घेतले आहे.

उत्तर - आयनिक


इ. ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नक्षत्रे येतात.

उत्तर - नऊ


उ. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे "भ्रमण आहे.

उत्तर - भासमान


2. आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल? का?

उत्तर -  

तारे दररोज चार मिनिटे लवकर उगवतात व चार मिनिटे लवकर मावळतात. त्यामुळे 30 दिवसांनी तो आजच्यापेक्षा 120 मिनिटे म्हणजे दोन तास आधी उगवेल

ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्र व सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात. सूर्य दिवसाला सुमारे एक अंश तर चंद्र दिवसाला बारा ते तेरा अंश ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे सरकलेला दिसतो. पृथ्वी सूर्याभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने असे होते.


3. 'नक्षत्र लागणे' म्हणजे काय ? पावसाळ्यात 'मृग नक्षत्र लागले, ' म्हणतात याचा अर्थ काय?

उत्तर -

पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यांवरून आणि तारकासमूहांवरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते. जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते, याला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो. प्रत्येक राशीत सव्वादोन नक्षत्रे येतात. या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठरावीक रास व त्यातील ठरावीक नक्षत्र असते. जेव्हा सूर्य त्या ठरावीक रास व नक्षत्रासमोर येतो, तेव्हा अशा वेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतात. पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो म्हणून पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात.



 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. तारकासमूह म्हणजे काय ?

उत्तर -

खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात.



आ. आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हांला वाटते ?

उत्तर -

उत्कृष्ट दर्जाची दुर्बीण (Telescope), दिशा दाखवणारे होकायंत्र, आकाश नकाशा या सर्व वस्तू महत्त्वाच्या आहेत. शहरापासून दूर अमावास्येच्या दिवशी आकाश निरीक्षण करणे उपयुक्त असते.



इ. ‘ग्रह - तारे - नक्षत्र' यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो, असे म्हणणे योग्य आहे का? का?

उत्तर -

'ग्रह-तारे-नक्षत्र' यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही. कोणत्याही संशोधनाद्वारे 'ग्रह-तारे-नक्षत्र' यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. म्हणून ग्रह-तारे-नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य नाही.


5. आकृती 20.1 अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवनप्रवासासंदर्भात परिच्छेद लिहा.

उत्तर -




तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात. गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते व आकुंचनाने तो ढग दाट व गोलाकार होतो. या वेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढल्याने तापमानामध्येही प्रचंड वाढ होते व तेथे ऊर्जानिर्मिती होऊ लागते . अशा हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला 'तारा' (Star) असे म्हणतात. पुढे तापमानात वाढ होणे, आकुंचन, प्रसरण या क्रियांमुळे ताऱ्यांचे स्वरूप बदलत जाते. या प्रक्रियेसाठी फार मोठा कालावधी लागतो. हाच ताऱ्यांचा जीवनप्रवास असून ताऱ्यांचे विविध प्रकार याच स्वरूपांमुळे ओळखले जातात.  आकाशगंगेतील ताऱ्यांमध्ये रंग, तेजस्विता तसेच आकारानुसार मोठी विविधता दिसून येते.



Post a Comment

Previous Post Next Post