आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा ?
अ. पोलीस नियंत्रण कक्ष - १००
आ. अग्निशामक यंत्रणा - १०१
इ.रुग्णवाहिका - १०२
ई. देशपातळीवरील एकच आपत्कालीन नंबर - १०८/११२
तात्काळ काय उपाय कराल ?
अ. कुत्रा चावला
उत्तर
१)जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशिअम परमँगनेटच्या पाण्याने धुवा.
२)जखमेवर कोरडे कापड ठेवा.
३) डॉक्टरी इलाज करा, अँटीरेबीज इंजेक्शन घ्या.
आ. खरचटले / रक्तस्राव..
उत्तर
१) जखम जर छोटी असेल तर जंतुनाशक मलम लावू शकता
२) जखम जर जास्त किंवा खोल असेल तर त्वरित डॉक्टर कडे जावे
इ. भाजणे / पोळणे
उत्तर
किरकोळ भाजल्यास
१) जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा.
२) पिण्यास पाणी दया.
३) निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा व जखम हलक्या हाताने पुसून घ्या.
४) तेलकट मलम लावू नका.
५) जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका.
गंभीर भाजल्यास -
१) मानसिक आधार दया.
२) निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाका.
३) दागिने, बूट काढून ठेवा.
४)त्वचेवर आलेले फोड फोडू नका.
५) तेलकट मलम लावू नका.
६) कपडे चिकटले असल्यास ते काढण्याचा प्रयत्न करू नका.
७) शुद्धीत असल्यास पिण्यास पाणी दया. चहा, कॉफी, उत्तेजक पेये देऊ नका.
८) तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
ई. सर्पदंश
उत्तर
१)जखम पाण्याने धुवा.
२)बाधितास धीर दया.
३)दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधा.
४)तातडीने वैदयकीय मदत घ्या.
उ.उष्माघात
उत्तर -
१) रुग्णास सावलीत, थंड ठिकाणी न्या..
२) शरीर थंड पाण्याने पुसा.
३) मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवा.
४) पिण्यास भरपूर पाणी, सरबतासारखी पेये दया.
५) उलटी झाली असल्यास अथवा अशक्तपणा आला असेल, तर मान एका बाजूस करून उताणे झोपवा.
६)तातडीने वैदयकीय मदत घ्या किंवा दवाखान्यात हलवा.
असे का घडते ?
अ. महापूर
उत्तर
१)महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे.
२) अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते, तेव्हा पुराचे संकट ओढवते.
३) बेसुमार पाऊस झाला, की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरते.
आ. जंगलांना आग
उत्तर
१)कधीकधी सुक्या फांद्या एकमेकांवर घासून वणवा भडकू शकतो
इ. इमारत कोसळणे / दरडी कोसळणे
उत्तर
१)भूकंपामुळे जमिनीत कंपन झाल्यामुळे इमारत कोसळू शकते
२)अतिवृष्टी मुळेही दरड कोसळली शकते
ई.वादळ
उत्तर
१)हवेत निर्माण होणारे कमी-अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात.
उ. भूकंप
उत्तर
१)भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते.
२)त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात.
४. खालील प्रश्नांची तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अ. आपत्ती म्हणजे काय ?
उत्तर
अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात.
आ. आपत्तींचे प्रकार कोणते ?
उत्तर
मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती
इ. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ?
उत्तर
लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यांसाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.
ई. आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते?
उत्तर
आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन-असे आपत्ती व्यवस्थापनाचे दोन घटक आहेत.
५. सर्पमित्र कसे काम करतात ?
उत्तर
सर्पमित्र एखाद्या लोकांच्या राहण्याच्या परिसरात जर साप घुसला असेल तर त्यांना ते पकडतात व सुरक्षितपणे जंगलात नेऊन सोडून देतात यामुळे त्या प्राण्याचा जीवही जात नाही
सर्पमित्रांना सापांबद्दल पूर्ण माहिती असते यामुळे ते त्यांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतात