१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ. अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला.. म्हणतात.
उत्तर - पोषण
आ. शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना... .म्हणतात.
उत्तर - पोषकतत्त्वे
इ. कर्बोदके व ......पासून शरीराला..मिळते
उत्तर - स्निग्ध पदार्थ, ऊर्जा
ई. संतुलित आहारात ........पोषकतत्त्वांचा......प्रमाणात समावेश असतो.
उत्तर - सर्व, योग्य
उ. अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वांत मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली............गरज भागते.
उत्तर - ऊर्जेची, कर्बोदकांची, पोषणाची, तंतुमय पदार्थांची
ऊ. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने येतो.
उत्तर - लट्ठपणा
२. खनिजे व जीवनसत्त्वांच्या तक्त्यांमधून ही माहिती शोधून काढा.
अ. लिंबूवर्गीय फळांमधील पोषकतत्त्वे.
उत्तर - जीवनसत्व C
आ. दुधापासून मिळणारी खनिजे / जीवनसत्त्वे.
उत्तर - कॅल्शियम आणि फॉस्फरस ही खनिजे A,B,D ही जीवनसत्त्वे
इ. रातांधळेपणा, स्कव्ह, मुडदूस, बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे.
उत्तर -
रातांधळेपणा
कारण - जीवनसत्त्व A ची आहारात कमतरता.
लक्षणे - कमी उजेडात न दिसणे, अंधत्व येणे.
स्कव्हीं-
कारण - जीवनसत्त्व C ची आहारात कमतरता.
लक्षणे - हिरड्यांमधून रक्तस्राव होणे.
मुडदूस
कारण - जीवनसत्त्व D ची आहारात कमतरता.
लक्षणे - हाडे मऊ पडणे, त्यामुळे वेदना होणे, हाडे सहजगत्या मोडणे.
बेरीबेरी
कारण - जीवनसत्त्व B1 ची आहारात कमतरता.
लक्षणे - चेतातंतूचे कार्य योग्यरीत्या होणे.
ई. वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ.
उत्तर
रातांधळेपणा टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ : लाल व पिवळ्या भाज्या, फळे, पालेभाज्या, दूध, लोणी.
स्कॅव्ह टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ : संत्री आणि लिंबूवर्गीय फळे, आवळा, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या.
मुडदूस टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ : दूध, मासे, अंडी, लोणी, सूर्यप्रकाशात बसणे.
बेरीबेरी टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ : तृणधान्ये, कवचफळे, डाळी, दूध, मासे, मांस.
उ. अॅनिमिया होण्याची कारणे.
उत्तर - आहारात जीवनसत्व B12 आणि लोहाची कमतरता
ऊ. दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज.
उत्तर - कॅल्शियम आणि फॉस्फरस
ए. A जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियांवर होणारा परिणाम.
उत्तर - डोळे
योग्य पर्याय निवडा.
अ. डाळींपासून पुढील पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात.
१) कर्बोदके २) स्निग्ध पदार्थ ३) प्रथिने, ४) खनिजे
उत्तर - प्रथिने
आ. या पदार्थांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते.
१) तृणधान्ये २) पालेभाज्या ३) पाणी ४) आवळा
उत्तर - तृणधान्ये
इ. या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.
१) लोह २) कॅल्शिअम ३) आयोडीन ४) पोटॅशिअम
उत्तर - आयोडीन
ई. याचा जंक फूडमध्ये समावेश होतो.
१) संत्री २) दूध ३) भाकरी ४) चॉकलेट
उत्तर - चॉकलेट