आम्ल, आम्लारी ओळख स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड | std 8th General Science digest prashna uttare

 





* रिकाम्या जागा भरा.


1. आम्लातील प्रमुख घटक......आहे. 

उत्तर - H+ आयन


2. आम्लारीतील प्रमुख घटक....... आहे.

उत्तर - OH- आयन


3. टार्टारिक हे ........आम्ल आहे.

उत्तर - सौम्य



* जोड्या लावा.

'अ' गट


1. चिंच - टार्टारिक आम्ल

2. दही - लॅक्टिक आम्ल

3. लिंबू - सायट्रिक आम्ल

4. व्हिनेगर - अॅसेटिक आम्ल


* चूक की बरोबर ते लिहा


अ. धातूंची ऑक्साइडस् आम्लारीधर्मी असतात.

उत्तर -बरोबर


आ. मीठ आम्लधर्मी आहे.

उत्तर   चूक


 इ. क्षारांमुळे धातूचे क्षरण होते.

 उत्तर    चूक


ई. क्षार उदासीन असतात.

 उत्तर      बरोबर


* पुढील पदार्थांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटांत वर्गीकरण करा.

HCI, NaCl, MgO, KCl, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3

उत्तर-

आम्लधर्मी - HCI, H2SO4, HNO3

आम्लधर्मी - CaO, MgO, NA2CO3

उदासीन - H2O, NaCl, KCI




* सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंदयात

सर्वांत जास्त महत्त्व का आहे?

उत्तर - 

1. रासायनिक खतांच्या उत्पादनात सल्फ्युरिक आम्ले वापरली जातात.

2. औषधी , डाय, सुगंधी द्रव्ये यांच्या निर्मिती प्रक्रियेत  सल्फ्युरिक आम्लांचा वापर होतो.

3. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी (विदयुत घट) मध्येही वापरतात.



* उत्तरे दया.

अ. क्लोराइड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे ?

 उत्तर -     हायड्रोक्लोरिक


आ. एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते. खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे ?

 उत्तर  -     कार्बोनेट


इ. प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली. त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल ?

उत्तर -

- जर बाटलीच्या द्रव्यात नीला लिटमस पेपर बुडवला आणि जर तो तांबडा झाला तर ते द्रव्य आम्ल आहे  

 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा.

उत्तर -

- आम्ल 

१) 1. आम्लाची चव आंबट असते.

२) आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन (H+) हा मुख्य घटक असतो. 

३) आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो.


आम्लारी

१) आम्लारीची चव कडवट असते. 

२) आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH) हा मुख्य घटक असतो. 

३)आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो.



आ. दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही ?

उत्तर -

दर्शक ही सेंद्रिय संयुगे असल्याने दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही.


इ. उदासिनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात ?

उत्तर - 

क्षार व पाणी



ई. आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते ?

उत्तर -

१) सल्फ्यूरिक आम्ल - रासायनिक खतांच्या उत्पादनात सल्फ्युरिक आम्ले वापरली जातात.

औषधी , डाय, सुगंधी द्रव्ये यांच्या निर्मिती प्रक्रियेत  सल्फ्युरिक आम्लांचा वापर होतो.

 विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी (विदयुत घट) मध्येही वापरतात.

२) हायड्रोक्लोरिक आम्ल - औषधी

३) नायट्रिक आम्ल - सुगंधी द्रव्य, औषधे, स्फोटक द्रव्य, रंग


* खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा.


उत्तर - 

1. आम्ल

2.  आम्ल 

3. आम्लारी


सूत्रावरून रासायनिक नावे लिहा 

H2SO4, . Ca(OH)2, HCl, NaOH, KOH, NH4OH.


उत्तर -

H2SO4 - सल्फ्युरिक आम्ल


 Ca(OH)2 - कॅल्शिअम हायड्रॉक्साइड


HCl - हायड्रोक्लोरिक आम्ल


NaOH – सोडिअम हायड्रॉक्साइड


KOH – पोटॅशिअम हायड्रॉक्साइड


NH4OH - अमोनिअम हायड्रॉक्साइड



2 Comments

Previous Post Next Post