मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड | Std 8th General Science digest prashna uttare







माझा जोडीदार शोधा.


'अ' गट


1. हृदयाचे ठोके - ७२


2. RBC - ५० ते ६० लक्ष प्रती घनमिली


3. WBC - ५००० ते १०००० प्रती घनमिली


4. रक्तदान - ३५० मिली 


5. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान - ३७°C


6. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू - ७.४ 




1. श्वसनसंस्था


इंद्रिये - १) नाक २)घासा ३)श्वसननलिका ४)फुफ्फुसे ५) श्र्वासपटल


कार्ये - १) श्वसनक्रियेची व श्वसनसंस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते.

२) घसा - घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. स्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. त्यामुळे श्वासनलिकेत  बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते. यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते..

३) श्वासनलिका : श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो.

४)फुफ्फुसे - फुप्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो. फुप्फसातील वायुकोशांभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते. रक्तातील तांबड्या पेशी (RBC) मध्ये हिमोग्लोबीन हे लोहयुक्त प्रथिन असते. वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबीन शोषून घेते. त्याचवेळी CO2 व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात. ऑक्सीजन रक्तात घेतला जातो. CO2 आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छवासावाटे बाहेर काढले जाऊन उच्छवासावाटे बाहेर टाकले जातात.

श्र्वासपटल - श्वासपटल हे उदरपोकळी व छातीची पोकळी (उरोपोकळी) यांच्या दरम्यान असते.  बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे. या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसावर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्वास घडण्यासाठी गरजेची असते.


2. रक्ताभिसरण संस्था


इंद्रिये - १) हृदय २) रोहिण्या/ धमन्या ३) नीला ४) रक्तकेशिका

५) रक्तपेशी ६) रक्तद्रव्य

कार्ये - १) हृदय - हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस 'रक्ताभिसरण' म्हणतात. रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाच्या आकुंचन आणि शिथिलीकरण या एकांतरीत क्रिया घडत असतात. हृदयाचे लागोपाठचे एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका होतो.


रोहिणी/धमन्या - हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुप्फुसधमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते. त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात.


नीला (शीरा)


शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. फुप्फुसशिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती (कार्बनडाय ऑक्साइड युक्त) रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. यांची भित्तिका पातळ असते. तसेच, यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात.



केशवाहिन्या (केशिका) - केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरके व जीवनसत्त्वे पेशींत मिळतात, तर पेशींतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. त्यांनाच आपण शिरा म्हणतो. प्रत्येक अवयवांमध्ये केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.


रक्तकानिका / रक्तपेशी -

 * लोहित रक्तपेशी (RBC) - या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो.

* श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) - पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात  रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.

 * रक्तपट्टीका (Platelets) - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.


६) रक्तद्रव्य - 

* रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने 1ते 2% असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात.

* अल्ब्युमिन संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.

* ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.

* फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.

* असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू  कार्याचे नियंत्रण ठेवतात.






8. कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर कराव रिकाम्या जागा भरा. 

(हिमोग्लोबीन, आम्लारीधर्मी, श्वासपटल, अस्थिमज्जा, ऐच्छिक, अनैच्छिक,आम्लधर्मी)


अ. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये..... हे लोहाचे संयुग असते.

उत्तर - हिमोग्लोबिन


आ. हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते.

उत्तर - श्वासपटल


इ. हृदय स्नायू.. ...... असतात.

उत्तर - अनैच्छिक


 ई. ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH .... असते.

उत्तर - आम्लधर्मी


उ. RBC ची निर्मिती मध्ये होते.

उत्तर - अस्थिमज्जा 



9. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.


अ. A, O, K, AB, B

उत्तर - K

आ. रक्तद्रव्य, रक्तपट्टीका, रक्तपराधान, रक्तकणिका

उत्तर - रक्तपराधान

 इ. श्वासनलिका, वायूकोश, श्वासपटल, केशिका

उत्तर - केशिका

 ई. न्यूट्रोफिल, ग्लोब्युलिन्स, अॅल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बीन 

उत्तर - न्युट्रोफिल 



4. सकारण स्पष्ट करा.


अ. मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.

उत्तर - १) हिमोग्लोबिनचा रंग हा तांबडा असतो. 

२) हिमोग्लोबिन हे प्रथिन लोहित रक्तपेशीत असते. 


आ. श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते.

उत्तर - १) बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे उदरपोकळी व छातीची पोकळी (उरोपोकळी) यांच्या दरम्यान असते.

२) बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे, या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्वास घडण्यासाठी गरजेची असते.


इ. रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.

 उत्तर - १) रक्त कोणत्याही प्रक्रियेने निर्माण करता येत नाही. ते फक्त मानवी शरीरात नैसर्गिकतः निर्माण होते

२) काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान आहे. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि शस्त्रक्रिया अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो. यामुळेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.


ई. 'O' रक्तगट असलेल्या व्यक्तीला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात.

उत्तर -  १) 'O' रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या लोहित रक्तपेशींवर कोणतेही प्रतिजन नसते. 

२) रक्त रक्तग्राही व्यक्तींच्या शरीरात गोठले जात नाही. 


उ. आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.

उत्तर - १) मिठामध्ये सोडियम आयन शरीरात घेतले जातात.

२) सोडियम मुळे रक्तदाब वाढतो.

३) यामुळे ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांना जास्त मीठ खाणे हानिकारक असू शकते.


5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ. रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.

उत्तर - १) पचन संस्था अन्नपदार्थाचे पोषणद्रव्यात रूपांतर करते

२) श्वसन संस्थेच्या कार्यानुसार हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो.

३)आणि चयापचयाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साइड शरीराच्या बाहेर टाकला जातो.

४) शोधलेली पोषणद्रव्ये, ग्लुकोज यांचे ऑक्सिजन च्या साहाय्याने मंद ज्वलन होऊन ऊर्जा निर्माण होते (ऑक्सीडीकरण)

आ. मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.

उत्तर - १) रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल पडक असतो आणि चव खारट असते तसेच सामू (pH) 7.4 असतो. रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते.

२) रक्तकानिका / रक्तपेशी -

* लोहित रक्तपेशी (RBC) - या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो.

* श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) - पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.

 * रक्तपट्टीका (Platelets) - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

 रक्तद्रव्य - 

* रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने 1ते 2% असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात.

* अल्ब्युमिन संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.

* ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.

* फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.

* असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात.

रक्ताची कार्ये

1. वायूंचे परिवहन : फुप्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांत पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच ऊर्तीकडून फुप्फुसांमध्ये CO2, आणला जातो.

2. पोषणतत्त्वांचे वहन (पेशींना खादय पुरविणे) : अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले यांसारखी पचन झालेली साधी पोषणत्त्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात.


3. टाकाऊ पदार्थांचे वहन: युरिया, अमोनिया, क्रिएटिनीन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात | जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात. 


4. शरीररक्षण- रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात.


5. विकर व संप्रेरक परिवहन - विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात.


6. तापमान नियमन : योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यांमुळे शरीराचे तापमान 37 °C इतके कायम राखले जाते.


7. शरीरातील सोडिअम,पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणे 


8. रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करतात.

इ. रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.

१) एखादया व्यक्तीला अपघात झाला की जखमांवाटे रक्तस्त्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीही रुग्णास रक्त दयावे लागते. तसेच अॅनेमिया, थॅलॅसेमिया (Thalassemia), कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही रक्तपुरवठा केला जातो. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला 'रक्त पराधान' म्हणतात.

२) रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त रुग्णाला दिले जाते. रक्त पराधनात रक्तगट न जुळल्यास रुग्णाला धोका | पोहोचू शकतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याचाही संभव असतो.

३) काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान आहे. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि शस्त्रक्रिया अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो. यामुळेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.

6. फरक स्पष्ट करा.


अ. धमन्या व शिरा

धमन्या

१) हृदयापासून शरीराकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असे म्हणतात.

२) धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात.

३) धमण्यांच्या भित्तिका जाड असतात

४) फुप्फुसधमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. 

५) पोकळीमध्ये झडपा नसतात


शिरा

१)शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात.

२) बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. 

३) यांची भित्तिका पातळ असते. 

४) फुप्फुसशिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती (कार्बनडायऑक्साइड युक्त) रक्त वाहून नेले जाते.

५) यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात.


आ. बहिः श्वसन व अंतःश्वसन 

बहिः श्वसन

१) बाहेरून शरीरात हवा घेणे आणि बाहेर हवा सोडणे या क्रियेला बहि: श्वसन म्हणतात.

२)हे पेशी आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये हो

३) यात ऑक्सिजनचा हिमोग्लोबिनशी संयोग होतो

अंतःश्वसन

१) फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील CO2 फुफ्फुसांकडे पोहोचवते व ती हवा उच्छ्वासावाटे बाहेर टाकली जाते.

२) हे फक्त शरीरातील पेशीमध्ये होते

३)यात पेशींमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन ऊर्जानिर्मिती होते





7. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल?

उत्तर - १) लोहित रक्तपेशी व श्वेत रक्तपेशी यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे

२) रक्तात कोणताही परजीवी सूक्ष्मजीव नसावा

३) रक्तदात्याला व्यसने नसावी

४) रक्तदाता HIV वाहक नसावा.



10. खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा. आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी, हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.

उत्तर

१)निळसर नखे म्हणजे ऑक्सिजन ची कमी

२) श्वसन संस्थेचे विकार असण्याची शक्यता


11. तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे

उत्तर

१) काकांनी डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे आहार घेतला पाहिजे. 

२) डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे औषधे वेळेवर घेणे गरजेचे आहे

३) अन्नामध्ये मिठाचे प्रमाण कमी असावे जात मिठाचे सेवन करू नये.





अ. धमन्या व शिरा


धमन्या शिरा 
१) हृदयापासून शरीराकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. १)शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात.
२) धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. २) बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात
३) धमण्यांच्या भित्तिका जाड असतात ३) यांची भित्तिका पातळ असते. 
४) फुप्फुसधमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात.  ४) फुप्फुसशिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती (कार्बनडायऑक्साइड युक्त) रक्त वाहून नेले जाते.
५) यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात ५) यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात.
बहि: श्वसन अंतःश्वसन
१) बाहेरून शरीरात हवा घेणे आणि बाहेर हवा सोडणे या क्रियेला बहि: श्वसन म्हणतात. १) फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील CO2 फुफ्फुसांकडे पोहोचवते व ती हवा उच्छ्वासावाटे बाहेर टाकली जाते.
२)हे पेशी आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये होते २) हे फक्त शरीरातील पेशीमध्ये होते
३) यात ऑक्सिजनचा हिमोग्लोबिनशी संयोग होतो.
३)यात पेशींमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन ऊर्जानिर्मिती होते

Post a Comment

Previous Post Next Post