माझा आवडता नेता - महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी | Majha Avadata Neta - Mahatma Jyotiba Phule Nibandh Marathi

 



           महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये सातारा जिल्ह्यातील छोट्या गावात माळी समाजातील गोऱ्हे कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते ज्योतिबा फुले यांच्या आईचे निधन ते अवघे एक वर्षाचे असताना झाले त्यांचा सांभाळ त्यांच्या वडिलांनीच केला. 

    महात्मा फुले हे थोर समासुधारक होते  त्यांचे लग्न १८४० साली सावित्रीबाई फुले यांच्याशी झाले तेव्हा त्यांचे वय फक्त १३ वर्ष होते व   त्यांनी १८४१ मध्ये त्यांनी त्यांचे शिक्षण स्कॉटिश मिशनरी हाई स्कूल मधून पूर्ण केले. ते ब्राह्मणवादी विचारांचे विरोधी होते यामुळे ब्राह्मणांचा त्यांना खूप विरोध होत होता 

          खूप लहान वयात त्यांनी मोठी मोठी कामे केली होती पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा १८५४ रोजी उभारली आणि सावित्रीबाई फुले ह्या आधुनिक भारताच्या सर्वात पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ज्या काळी मुलींच्या व दलितांच्या  शिक्षणाला विरोध होत होता त्या काळी त्यांनी क्रांती घडवून आणली. त्या काळी उच्च जातीतील स्त्रियांना जर पती वारला तर पुन्हा लग्न करण्याची परवानगी नव्हती. अश्या स्त्रियांना समाजात खूप तिरस्कृत वागणूक मिळायची १८६३ साली त्यांनी त्या विधवा गर्भवतींसाठी अनाथाश्रम उघडले त्यांना समाजाने नाकारले होते.

            असे म्हटले जाते की एकदा त्यांच्या एका उच्च जातीतील असलेल्या मित्राच्या लग्नात गेले तेव्ह्या त्यांचा ते छोट्या जातीतील असल्यामुळे त्यांचा अपमान करण्यात आला होता. या घटनेमुळे त्यांच्या मनात समाजातील वर्ण व्यवस्थेबद्दल चीड निर्माण झाली. त्यावेळी शूद्र असलेल्या लोकांना त्यांनी "दलीत" म्हणून संबोधले त्या वेळी शूद्रांना सार्वजनिक विहिरीतून पाणी आणण्यासाठी मनाई केली जाई तर ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या घरात शुद्रांसाठी पाण्याचा हौद उपलब्ध करून दिला

      त्यांनी लिहिलेली पुस्तके आजही खूप प्रसिद्ध आहेत जसे शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी इत्यादी

       १८७३ मध्ये महात्मा फुलेंनी ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना केली सर्व जातीचे व धर्माचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत अशी त्यांनी योजना केली होती.

              आज कालच्या आधुनिक जगात मुलींना जो अधिकार महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मिळवून दिला आहे हा मोलाचा आहे याची आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. त्यांनी समाजाला पुढे आणण्यासाठी किती कष्ट सहन केले होते याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

  खूप मोजक्या शब्दात महात्मा ज्योतिबा फुलेंनी विद्येचे महत्त्व सांगितले होते- विद्येविना मती गेली मतिविना निती गेली नीतिविना गती गेली गतिविना वित्त गेले इतके अनर्थ एका अविद्येने केले  



















ज्योतिबा फुले निबंध 

Jyotiba phule nibandh 

ज्योतिबा फुले यांच्यावर निबंध 

Jyotiba phule yanchyawar nibandh

Jyotiba phule yanchi mahiti

ज्योतिबा फुले यांची माहिती



Post a Comment

Previous Post Next Post