1. जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण व्हिटाकर पद्धतीने मांडा.
उत्तर :
(1)जीवाणू- सृष्टी- मोनेरा
(2)आदिजीव- सृष्टी- प्रोटिस्टा
(3)शैवाल: एकपेशीय असल्यास सृष्टी-प्रोटिस्टा,बहुपेशीय असल्यास सृष्टी- वनस्पती.
(4)आदिकेंद्रकी- सृष्टी- मोनेरा
(6)दृश्यकेंद्रकी- मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी असू शकते.
2. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा.
उत्तर -
3. माझा जोडीदार शोधा.
१) कवक - कॅन्डिडा
२) प्रोटोझुआ - अमिबा
३) विषाणू - बॅक्टेरियोफेज
४) शैवाल - क्लोरेल्ला
५) जीवाणू - आदिकेंद्रकी
4. दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
अ. लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत.
उत्तर - चूक
स्पष्टीकरण - लॅक्टोबॅसिलाय हे दुधाचे दहित रूपांतर करण्यासाठी उपयोगी जिवाणू आहेत.
आ. कवकांची पेशीभित्तिका कायटीनपासून बनलेली असते
उत्तर - बरोबर
स्पष्टीकरण - कवकांची पेशिभित्तिका कायटीन या जटिल शर्करेपासून बनलेली असते
इ. अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो.
उत्तर - बरोबर
स्पष्टीकरण - अमिबा आदिजिव आहे ते छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतात.
ई. प्लास्मोडिअममुळे आमांश होतो.
उत्तर - चूक
स्पष्टीकरण - एन्टामिबा हिस्टोलिटिका आमांश होण्यास कारणीभूत आहे तर प्लाज्मोडिअम व्हायवॅक्स मलेरिया (हिवताप) होण्यास कारणीभूत आहे.
उ. टोमॅटोविल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे.
उत्तर - चूक
स्पष्टीकरण - टोमॅटोविल्ट हा विषाणूजन्य रोग आहे हे विषाणू वनस्पती पेशींना संसर्ग करतात.
5. उत्तरे लिहा.
अ. व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा.
उत्तर -
१) • वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले.
* पेशीची जटिलता : आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी
* सजीवांचा प्रकार / जटिलता : एकपेशीय किंवा बहुपेशीय
* पोषणाचा प्रकार : वनस्पती - स्वयंपोषी (प्रकाश संश्लेषण), कवके - परपोषी (मृतावशेषातून अन्नशोषण), प्राणी- परपोषी (भक्षण)
* जीवनपद्धती : उत्पादक वनस्पती, भक्षक - प्राणी, विघटक - कवके -
* वर्गानुवंशिक संबंध : आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय
२) व्हिटाकरनंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरी आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात, हे या पद्धतीचे यश आहे.
आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर -
१ ) विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव-निर्जिवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात (Microbiology) केला जातो.
२) विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. (आकार सुमारे 10nm ते 100nm )
३) स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA (डीऑक्सीरायबो न्युक्लिक आम्ल) किंवा RNA (रायबो न्युक्लिक आम्ल) पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते.
४) वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात.
५) विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात.
इ. कवकांचे पोषण कसे होते ?
उत्तर -
१) कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व सजीवांचा समावेश होतो.
२)बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात.
ई. मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो ?
उत्तर -
१) मोनेरा सृष्टीतील सर्व सजीव एकपेशीय असतात.
२) स्वयंपोषी किंवा परपोषी असतात.
३) हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात.
* क्लोस्ट्रिडिअम टिटॅनी
* व्हायब्रीओ कोलेरी
* ट्रेपोनेमा पॅलीडम
* स्ट्रोप्टोकोकास न्युमोनी
* लेजीओनेला न्युमोनि
* सालमोनेला टायफी
* स्टॅफायलोकॉकस ऑरिअस
* क्लोस्ट्रिडिअम बोटयूलीनम
6. ओळखा पाहू मी कोण ?
अ. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशीअंगके नसतात.
उत्तर - मोनेरा सृष्टीतील सजीव
आ. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल युक्त पेशीअंगके असतात.
उत्तर - प्रोटिस्टा
इ. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते.
उत्तर - बुरशी
ई. माझे प्रजनन बहुधा विखंडनाने होते.
उत्तर - जिवाणू, आदिजीव
उ. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.
उत्तर - विषाणू
ऊ. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे.
उत्तर - शैवाल
7. अचूक आकृत्या काढून नावे दया.
अ. जिवाणूंचे विविध प्रकार
उत्तर
आ. पॅरामेशिअम
उत्तर -
इ. बॅक्टेरिओफेज
उत्तर
8. आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा.
जिवाणू, कवक, विषाणू, शैवाल
उत्तर -
विषाणू - जिवाणू - कवक - शैवाल
SAMARTH MANE
ReplyDelete