रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर
येणारी ...... किरणे शोषून घेतो.
उत्तर - अतिनील किरण
आ. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण ..........टक्के साठा उपलब्ध आहे.
उत्तर - 0.3%
इ. मृदेमध्ये .....व...... घटकांचे अस्तित्व असते.
उत्तर - जैविक व अजैविक
२. असे का म्हणतात
अ. ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.
उत्तर - ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. कारण सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होते.
आ. पाणी हे जीवन आहे
उत्तर - पाणी हे जीवन आहे कारण मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून त्याला दररोज तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज असते तसेच प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते यामुळे कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जगणे शक्य नाही.
इ. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.
उत्तर - समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे. कारण १) समुद्राच्या पाण्यापासून मीठ, आयोडीन व इतर खनिजे मिळवली जातात. २) प्रवाळ व मोती ही रत्ने समुद्राच्या पाण्यापासून मिळतात. ३) समुद्रातील पाण्यात असलेले जलचर जसे मासे, खेकडे इत्यादी अन्न म्हणून खाल्ले जातात ५) काही विशिष्ट प्रक्रिया करून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवता येते
३. काय होईल ते सांगा.
अ. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले
उत्तर - १) मृत वनस्पती , प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होते त्यामुळे मृदेवर कुथित मृदेचा थर तयार होतो
२) कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरविण्याचे काम करते. चांगल्या सुपीक मृदेमध्ये कुथित मृदेचे प्रमाण ३३% ते ५५% असते
३) सूक्ष्मजीव जर नसतील तर ही प्रक्रिया थांबून जाईल.
आ.तुमच्या परिसरात वाहने व कारखान्याची संख्या वाढली.
उत्तर - १) पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे.
२) आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे पाणी कमी पडू लागले आहे.
इ. पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला.
उत्तर - १) मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात तीन ते चार लिटर पाणी पिणे गरजेचे असते.
२) प्राण्यांमधील रक्त व वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्येही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
३) सजीवांचे अस्तित्व पाण्याशिवाय शक्य नाही.
४. सांगा मी कोणाशी जोडी लावू.
'अ' गट. उत्तर
१. कार्बनडायऑक्साइड वनस्पती व अन्न निर्मिती
२. ऑक्सिजन. ज्वलन
३. बाष्प. पाऊस
४. सूक्ष्मजीव. मृदेची निर्मिती
५. नावे लिहा.
अ. जिवावरणाचे भाग - जलावरण, शिलावरण, वातावरण
आ. मृदेचे जैविक घटक - सूक्ष्मजीव, कृमी, कीटक
इ.जीवाश्म इंधन - पेट्रोल, डिझेल, रॉकेल
ई. हवेतील निष्क्रीय वायू - अर्गोन, हेलियम, निऑन, क्रिप्टोन, झेनोन
उ. ओझोनच्या थरास घातक असणारे वायू - क्लोरोफलुरोकार्बन्स, कार्बन टेट्राक्लोराईड
६. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.
अ. जमीन आणि मृदा ही एकच असते.
उत्तर - चूक
आ. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात.
उत्तर - बरोबर
इ. मृदेचा २५ सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे १००० वर्षे लागतात.
उत्तर - चूक
ई. रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यांत करतात.
उत्तर - चूक
७. खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात लिहा.
अ. मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा.
उत्तर - १) जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो.
२)उन, वारा, पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी, पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात. त्यांपासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात.
३) जमिनीवरील झाडांची मुळेदेखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात.
४) मृदनिर्मितीची प्रक्रिया मंद गतीने होते परिपक्व मृदेचा २.५ सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्ष लागतात.
आ. पृथ्वीवर सुमारे ७१% भाग भूभाग पाण्याने व्यापला असून देखील पाण्याची कमतरता का भासते?
उत्तर - १) पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे.
२) वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. यामुळेच पाणीटंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
इ.हवेतील विविध घटक कोणते? त्यांचे उपयोग लिहा
उत्तर- १)पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सहा निष्क्रिय वायू, पाण्याची वाफ, धूलिकण, या सर्वांचा समावेश होतो.
२) नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.
• ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी आहे.
• निऑन - जाहिरातींसाठीच्या रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.
• क्रिप्टॉन - फ्लोरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.
• झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो.
• कार्बन डायॉक्साइड- वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां मध्ये वापरतात.
● अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.
• हेलिअम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.
ई. हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत.
उत्तर - १) हवेमध्ये आढळणारे अनेक घटक त्यापैकी एक ऑक्सीजन हा घटक सजीवांच्या श्वसनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
२) वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्व सजीवांसाठी पाणी हे गरजेचे असते प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्य तसेच मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालवतो म्हणून ३-४ लिटर पाणी गरजेचे असते.
३) जमीन - जमिनीतूनच आपण धान्य उगवतो आणि त्यावरच आपले जीवन चालते.