माझा आवडता सण दिवाळी आहे. हा सण भारतीयांद्वारे जगभरात साजरा केला जातो. जेव्हा श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासावरून अयोध्येत परतले त्यावेळी तेथील प्रजेने पूर्ण अयोध्येमध्ये दिव्यांनी रोषणाई केली त्याच्याच स्मरणात आपण दिवाळी हा सण साजरा करतो.
दिवाळी हा सण चांगल्या गोष्टींचा दृष्टावर विजय म्हणून साजरा केला जातो हा सण पाच दिवस साजरा केला जातो पहिला दिवस धनत्रयोदशी, दुसरा नरक चतुर्दशी, तिसरा लक्ष्मीपूजन, चौथा बलिप्रतिपदा आणि पाचवा भाऊबीज
पहिल्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा होते, दुसरा दिवस नरक चतुर्दशी या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करतात या दिवशी यम तर्पण केले जाते, तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन या दिवशी लक्ष्मी सहित गणेशाचे पूजन होते या दिवशी सर्व देवी महालक्ष्मीला सुख समृद्धी ची कामना करतात, चौथा दिवस बलिप्रतिपदा हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी बळी राजाची पूजा होते "इडा पिडा टळू दे बळी राज्याचे राज्य येऊ दे" असे म्हटले जाते, पाचवा दिवस म्हणजे भाऊ बीज या दिवशी बहिण भावाला घरी आमंत्रण देते त्याला टिळक लावते आणि भाऊही बहिणीला भेटवस्तू देतात.
दिवाळी हा सण खूप आनंदाने साजरा होतो, लोकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी झालेली असते, मी सुद्धा आई वडिलांसोबत बाजारात कपडे, मिठाई खरेदीला जातो , घराघरांमध्ये फराळ बनलेला असतो, घराघरांमध्ये दिव्यांनी रोषणाई असते, घराच्या बाहेर आकाशकंदील असतो, लोक फटाके फोडतात, अशाप्रकारे आनंदाने हा सण साजरा होतो म्हणून मला दिवाळी हा सण खूप आवडतो