मी नदी आहे झुळ झुळं वाहणारी, स्वच्छ सुंदर पाणी घेऊन निरंतर धावणारी, तहानलेल्यांची तहान भागवणारी, माझी अनेक नावे आहेत कोणी मला माता म्हणते, तर कोणी देवी
तहानलेले पशू पक्षी जेव्हा माझ्या काठावर येऊन पाणी पितात आणि तृप्त होतात तेव्हा मला फार आनंद होतो माझ्या पाण्यामध्ये अनेक जीव आपले आयुष्य जगात असतात मासे, साप, मगर, खेकडे, कासव, इत्यादी
पूर्वी मी खूप सुंदर दिसायचे मला पाहून सर्वांचे मन प्रसन्न व्हायचे, पहाटे पहाटे स्त्रिया पिण्यासाठी पाणी घेऊन जायच्या, कोणी माझ्या पाण्यात स्नान करायचे तर कोणी मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटत असे , लहान मुले खेळत असत त्यांना पाहून खूप आनंदी वाटे
पण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही लोक अगदी अमर्याद कचरा नदीत टाकत आहेत, गटारीचे घान पाणी माझ्यात मिसळवत आहेत पूर्वीसारखी माझी अवस्था राहिलेली नाही माझे रूपही आधिसारखे मन प्रसन्न करणारे नाही माझ्यातून दुर्गंधी येते माझ्या काठावर खूप सारा कचरा पसरलेला असतो
माणसाच्या वृत्तीचे मला नवल वाटते ते कधी मला त्यांना माझा उपयोग होतो म्हणून पूजतात तर कधी मला त्यांच्या स्वार्थासाठी अमर्याद दूषित करतात, माझ्या पात्रात बुडून जर एखादा व्यक्ती मरण पावला तर मला फार वाईट वाटते पण लोकांच्या प्रदूषणामुळे जेव्हा माझ्या मध्ये वास करणारे जीव जेव्हा मरण पावतात तेव्हा त्यांना त्याचे काही वाईट वाटत नाही
माणूस हा प्रगती करत आहे पण कधीही त्याला माझ्या दुरावस्थेबद्दल वाईट वाटले नाही त्याने कधीच माझ्यासाठी उपाय योजना केल्या नाहीत त्याने फक्त माझा फायदा घेतला आहे
जर माणसाने मला स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प नाही घेतला तर होणाऱ्या परिणामांना तेच जबाबदार असतील हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.