डॉ. पाटील हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांनी MBBS ही डिग्री 2000 साली पूर्ण केली आणि त्यानंतर त्यांनी पुण्यात क्लिनिक सुरू केले.
आमच्या घरात कोणत्याही सदस्याला काही त्रास होत असेल तर आम्ही त्यांच्या क्लिनिक मध्ये जातो, त्यांच्या ज्ञानाचे कौतुक करावेसे वाटते कारण काही क्षणातच ते रुग्णाचा आजार ओळखतात आणि त्यांनी दिलेल्या औषधिमळे आजार बरा व्हायला जास्त कालावधी लागत नाही. म्हणून त्यांच्या क्लिनिक मध्ये दूर दूर हून लोक येतात.
त्यांचा स्वभाव खूप खेळकर आहे, तसेच ते त्यांच्या रुग्णांशी फार आपुलकीने वागतात. लहानपणीची एक गोष्ट मला आठवते जेव्हा मला त्यांनी पहिल्यांदा इंजेक्शन दिले होते पण त्यांनी मला बोलण्यात इतके व्यस्त ठेवले होते की मला इंजेक्शनच्या वेदना कळल्याच नाही. त्यांचे संवाद कौशल्य इतके चांगले आहे त्यामुळे रुग्णांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे
त्यांचा मुख्य गुण म्हणजे ते मनाने खूप दयाळू आहेत जर कोणी एखादी गरीब व्यक्ती त्यांच्याकडे ट्रीटमेंट साठी आली तर ते त्यांच्याकडून जास्त पैसे घेत अगदी मोफत उपचारही करून देतात.
त्यांचा डॉक्टर क्षेत्रातील अनुभव खूप मोठा आहे खूप सारे MD, SURGENS डॉक्टर त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या या सर्व गुणांमुळे ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत.