माझा आवडता नेता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर Majha avadata Neta Dr. Babasaheb Ambedkar Marathi Nibandh My Favourite Leader - Dr. Babasaheb Ambedkar Marathi Nibandh

  







        माझ्या आवडत्या नेत्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे.  त्यांचे संपूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील इंदौर जिल्ह्यात स्थित महू गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई सपकाळ होते.
    

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यांनी आपले शिक्षण विदेशात पूर्ण केले त्यांनी तब्बल ६४ विषयांमध्ये मास्टर डिग्री मिळवली. लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्स मध्ये त्यांनी ८ वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या २ वर्ष ३ महिन्यात पूर्ण केला. Economics मध्ये विदेशात (p.hd)  पदवी मिळवणारे ते पाहिले भारतीय आहेत. तसेच दलीत जातीतील ते पहीले वकील ही होते.


      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुख्यतः दलितांसाठी लढा दिला. पूर्वी पासून चालत आलेली वर्ण व्यवस्थेमध्ये जे शूद्र म्हणून ओळखले जात त्यांच्यावर खूप अत्याचार होत असत.अस्पृश्याना सार्वजनिक तळे यात पाणी पिण्यास मनाई होती यासाठी डॉ. बाबासाहेब यांनी महाडच्या चवदार तळे येथे पाणी पिऊन सत्याग्रह केला.
  
      त्यांनी शूद्रांना गुलामगिरीतून बाहेर काढले आणि समाजातील उच-निच मिटवली. त्यांनी दलितांना बौद्ध धर्माची ओळख करून दिली. आणि त्यावेळी तब्बल ३,६५,००० दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे ऐतिहासिक कार्य त्यांनी घडवून आणले.


           जगाच्या पाठीवर असे खूप कमी विद्वान झाले आहेत बाबासाहेब आंबडकर त्यापैकी एक होते.दुर्दैवाने ६ डिसेंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले आजही त्यांना "सिम्बॉल ऑफ नॉलेज" म्हणून ओळखले जाते.अश्या विद्वान व्यक्तीला कोण आवडता नेता म्हणणार नाही यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे आवडते नेते आहेत.            


Post a Comment

Previous Post Next Post