माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. कुत्रा हा फार प्रामाणिक प्राणी असतो तो ज्या घरात राहतो त्या घराची तो राखण करत असतो
जगात कुत्र्याच्या अनेक प्रजाती आहेत त्यापैकी भारतात २१ प्रजाती आढळतात. काही कुत्रे हे उत्तम रित्या पाण्यात पोहू शकतात. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता ही मानवापेक्षा चाळीस पट जास्त असते.
आमच्या घरात "गोल्डन रिट्रिवर" नावाची प्रजाती आहे, त्याचे कान खालच्या बाजूला पसरलेले आहेत आणि त्याला रुबाबदार शेपुटही आहे तो दिसायला ही फार गुबगुबीत आहे त्याला आम्ही "सिंबा" नावाने हाक मारतो, तो खुप शांत, मैत्रिप्रिय आणि हुशारही आहे.
तो कोणावर कधी भुंकत ही नाही अनोळखी माणसांना पाहून पहिल्यांदा भुकतो पण त्यांच्याशी ओळख झाली की त्यांना तो पुन्हा भुंकत नाही.घरात आलेल्या पाहुण्यांना सिंबा लगेच आवडतो कारण तो दिसायला फार गोड आहे तो त्याच्या डोक्यावरून हात फिरवला की शेपटी हलवतो.त्याला त्याचे जेवण म्हणजे डोगफुड खूप आवडते त्याच्या समोर ते आणले की तो आनंदाने उड्या मारायला लागतो शेपटी हलवतो.
मी त्याला रोज सकाळी-संध्याकाळ फिरण्यासाठी घेऊन जातो त्याला बांधण्याची गरज पडत नाही कारण तो कोणावर कधीही भुंकत नाही त्याला मी मनसोक्त फिरू देतो. त्याला सर्व जण बघत असतात कारण तो दिसायला रुबाबदार दिसतो आणि त्याचे चालणेही तसेच रुबाबदार आहे. मी जेव्हा बाहेरून घरात येत असेल तर तो प्रेमाने माझ्या अंगावर येतो, आनंदाने शेपटी हलवतो, आनंदाने गोल गोल फिरतो तो माझ्यावर खूप प्रेम करतो मला ही तो तितकाच आवडतो.
कुत्रा हा खूप प्रेमळ प्राणी आहे जर आपण त्याला प्रेम दिले तर तो आपल्याला खूप प्रेम देतो म्हणून मला कुत्रा हा प्राणी खुप आवडतो.