माझा आवडता पक्षी मोर आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोराची मान उंच असते, त्याच्या डोक्यावर तुरा देखील असतो, मोर जेव्हा पिसारा फुलवतो तेव्हा आपण गडद निळया आणि हिरव्या रंगाची पिसे आपण बघु शकतो, मोर हा पावसाळ्यात आपला सुंदर पिसारा फुलवून नृत्य देखील करतो मोराचा आवाज ही फार सुंदर असतो.
निळ्या रंगाचा मोर हा भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतो तर हिरव्या रंगाचा मोर हा म्यानमार मध्ये आढळतो. तसा मोर हा पक्षी १५ वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतो.
मोर उडू ही शकतो पण फार उंचावर नाही एका विशिष्ट अंतरावर तो उडू शकतो पण तो उडत नाही मुख्यतः तो जमिनीवरच आढळतो. मोर हा शेतकऱ्यांचा मित्र तर किड्यांच्या शत्रू आहे कारण मोर आळ्या, किडे, उंदीर आणि सापही खातात.
मोराची पिसे ही सजावटीसाठी वापरली जातात माझ्याकडे ही मोराची काही पिसे आहेत मला त्या पिसांचा हळूवार स्पर्श फार आवडतो
मोर हा खूप सुंदर दिसणारा पक्षी आहे जो सगळ्यांचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतो. मी आमच्या गावाकडे मोराला पहिल्यांदा पाहिले होते त्याला पाहून त्याचे सौंदर्य मला खूप आवडले तेव्हा पासून मोर हा माझा आवडता पक्षी आहे.
Ashrit Avinash Lengure
ReplyDelete