माझा आवडता प्राणी मांजर आहे. मांजर ही एक पाळीव प्राणी आहे. तिला दोन कान, चार पाय, एक लांबलचक शेपटी आणि तिच्या अंगावर केस असतात. मांजरीची पिल्ले ही फार गोंडस दिसतात. मांजरींचा म्याव म्यावं आवाज ऐकायला खूप छान वाटतो.
जगात मांजरीच्या ३८ प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यापैकी भारतात १५ प्रजात्या आढळतात. मांजरी ह्या खूप हुशार असतात. मांजरींची वास घेण्याची क्षमता मानवापेक्षा १४ पट जास्त असते. मांजर तिच्या उंचीच्या ४-५ पट उंच उडी मारू शकते.
आमच्या घरात काही दिवसांपूर्वी मांजरीने चार पिल्ले दिली होती. ती लहानपणी खूपच गोंडस दिसायची नंतर ती हळू हळू मोठी होऊ लागली आम्ही त्यांना घरातील दुधाचे पदार्थ खायला द्यायचो,त्यांची आई ही खूप हुशार होती तिला जर दूध हवे असेल तर ती सारखी म्याव म्याव करायची आणि पायांना घासून चालायची पिल्ल लहान असल्यामुळे घराच्या बाहेर जात नसत पण त्यांची आई मात्र दिवसभर बाहेर फिरून नंतर बरोबर आपल्या पिल्लांकडे परत येई. ती पिल्ले दिवसभर घरभर इकडे तिकडे पळायची काही पिल्लांना तर नीट पळताही येत नव्हते पण त्यांना पाहून मला खूप आनंद व्हायचा मला त्या लहान पिल्लांसोबत खेळायला फार आवडायचे मी जर मांडी घालून खाली फरशीवर बसलो तर ती पिल्ले लगेच पळत पळत येऊन माझ्या मांडीवर बसायचे.
आता पिल्ले हळू हळू मोठी होऊ लागली आहेत पण त्यांच्यात तोच खेळकर पणा आहे आणि दिसायलाही खूप गोंडस आहेत पण आता ते अधीसारखे घरात बसून राहत नाहीत ते ही त्यांच्या आई सोबत बाहेर फिरायला जातात दिवसभर ते त्यांच्या आईसोबत फिरत असतात त्यांची आई त्यांची खूप काळजी घेते सारखी मागे बघून ते आहेत की नाही याची खात्री करून घेते
मांजर खूप गोड प्राणी आहे जिला सहज पाळीव बनवता येते. त्या कधीही दुसऱ्या प्राण्यांसारख्या हिंस्त्र होत नाहीत यामुळेच त्या सगळ्यांना आवडतात.