प्र. १. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा.
उत्तर -
१) गलका - ऐका
२) दिवा - लावा
३) दिवा - ठेवा
४) पार्किंगला - तुम्हांला
५) सोडता - लावता
६) वाहतुकीचे - ट्रॅफिक जाम'चे
७) नियंत्रण - आमंत्रण
प्र. २. खालील प्रसंगी काय करावे ?
ट्रैफिक सिग्नलचा -
(अ) लाल दिवा लागला - गाडीला ब्रेक लावावा
(आ) पिवळा दिवा लागला - इकडे तिकडे नीट लक्ष ठेवावे
(इ) हिरवा दिवा लागला - गाडी पुढे चालवावी
प्र. ३. खालील प्रसंगी तुम्ही काय कराल ?
(अ) गर्दीमध्ये तुम्ही हरवलात.
उत्तर - जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये जाऊन पोलिस काकांना आपले नाव व पत्ता सांगेल.
(आ) रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हांला जायचे आहे.
उत्तर - नेहमी झेब्रा क्रॉसिंग चा वापर करेल.
(इ) शाळेच्या रिक्षात मित्राचा डबा राहिला.
उत्तर - शाळेतील शिक्षकांना या बद्दल माहिती देऊन माझ्याकडे असलेला रिक्षा वाल्या काकांचा नंबर शिक्षकांना देईल जेणेकरून शिक्षक रिक्षावाल्याला फोन करतील व डब्याबद्दल रिक्षावाल्या काकांना कळवतील.
प्र. ४. वर्गामध्ये, घरी चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) आपल्याकडे रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे ?
उत्तर - रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालणे अपेक्षित आहे.
(उ) संकटकाळी धावती रेल्वे थांबवायची असल्यास प्रवासी काय करतील ?
उत्तर - रेल्वेमध्ये एक चैन दिलेली असते ती ओढली की रेल्वे थांबते, संकटकाळी धावती रेल्वे थांबविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.