रोपटे स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Ropate swadhyay iyatta tisari balbharati

 



प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा 


(अ) मुले कोणता खेळ खेळत होती? 

उत्तर - मुले शिवाशिवीचा खेळ खेळ होती.


(आ) मीनलची गम्मत कोण करीत होता?

उत्तर - पप्पू मोनलची गम्मत करीत होता.


(इ) पप्पूने राज्य घेण्यास नकार का दिला ? 

उत्तर - पप्पू चिडचिड्या स्वभावाचा असल्यामुळे राज्य घेण्यास त्याने नकार दिला.



प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा


(अ) पप्पू खेळताना मीनलची गंमत कशी करायचा? 

उत्तर - मीनल शिवण्यासाठी जवळ आली की पप्पू जोराने पळायचा. पुन्हा शांत उभा राहायचा. अशाप्रकारे बराच वेळ मीनल थकेपर्यंत पप्पू खेळताना तिची गंमत करायचा.


(आ) पप्पू थरथर का कापत होता ?

उत्तर - चूक कबूल करताना पप्पू गुरुजींसमोर रडत होता. गुरुजी आपल्याला खूप रागावतील असे त्याला वाटल्यामुळे पप्पू थरथर कापत होता.


(इ) गुरुजी पप्पूला काय म्हणाले?

उत्तर - गुरुजी पप्पूला म्हणाले की, “चुका होत असतात; पण त्या प्रामाणिकपणे कबूल करायला धैर्य लागतं. ते तू दाखवलं आहेस. पप्पू, तुझं चालताना लक्ष नव्हतं, म्हणून तुझा पाय रोपावर पडला. शेंडा तुटला. तुझ्याकडून नकळत चूक झाली आणि तू कबूलही केलीस. हे ऐकून बरं वाटलं मला. रोप लहानाचं मोठं होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते, तेव्हा ते मोठं होतं. तुमची आईसुद्धा तुम्ही लहानाचे मोठे होईपर्यंत तुमची खूप काळजी घेते बरं ! उद्या शाळेत येताना मी दोन रोपं आणणार आहे. त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी !”


(ई) पप्पूमधील कोणकोणते गुण तुम्हांला दिसतात ? उत्तर - पप्पू चिडचिड्या स्वभावाचा होता, पण तो प्रामाणिकही होता. चूक कबूल करण्याचे धैर्य त्याच्याकडे होते हे गुण पप्पू मध्ये होते. 


(उ) पप्पूचा कोणता गुण तुम्हांला घ्यावासा वाटतो?

उत्तर - आपली चूक प्रामाणिकपणे कबूल करणे यासाठी धैर्य लागते ते पप्पूकडे होते. हा गुण घ्यावासा वाटतो.



प्र. ३. वाक्यांत उपयोग करा.


(अ) आरंभ करणे.

वाक्य - इशिताने गावाला जाण्याच्या प्रवासाचा आरंभ केला.


(उ) टाळाटाळ करणे.

वाक्य - सुश्मिता घरकामात टाळा टाळ करते.


(आ) धूम पळणे.

वाक्य - आकाश कुत्र्याला बघून धूम पळत सुटला.


(ऊ) पाय लटपटणे.

वाक्य - सगळ्यांसमोर उभे राहून भाषण द्यायला मुलांचे पाय लटपटतात.


(इ) बट्ट्याबोळ होणे.

वाक्य - पावसाने सहलीचा बट्ट्याबोळ केला.


(ए) आकाश ठेंगणे वाटणे.

वाक्य - मनोजला पहिले बक्षीस मिळाल्याने त्याला आभाळ ठेंगणे वाटू लागले.


(ई) घाबरगुंडी उडणे.

वाक्य - जंगलात वाघाला पाहून सगळ्यांची घाबरगुंडी उडते.



प्र. ४. तुमच्याकडून एखादी चूक झाली, तर तुम्ही ते आईला कसे सांगाल? तुमची चूक तुम्ही कशी सुधाराल ?

उत्तर - आईला प्रामाणिकपणे माझ्याकडून झालेली चूक मी सांगेल आणि अशी चूक पुन्हा करणार नाही हे आईला पटवून देईल. 





Post a Comment

Previous Post Next Post