चित्रे स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Chitre swadhyay iyatta tisari balbharati

 




प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ) आईने बिम्मला काय बजावले?

उत्तर - मोठ्या रस्त्यावर जाऊ नको, असे आईने बिमला बजावले.


(आ) बिम्मचा चेहरा का उतरला?

उत्तर - बिम्मच्या चित्रांना आई गिजविन म्हणाली म्हणून विम्मच चेहरा उतरला. 


(इ) बिम्मने काढलेला हत्ती ट्रामप्रमाणे असावा, असे आईला का वाटले?

उत्तर - बिम्मने काढलेल्या हत्तीची शेपटी व सोंड  सारखीच असल्यामुळे हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले.


(ई) चित्रातील बब्बीच्या पायावर बिम्मने काय काढले?

उत्तर - चित्रातील बब्बीच्या पायावर बिम्मने बेडकी काढली.


(उ) आईने बिम्मला किती लाडू दिले?

उत्तर - आईने बिम्मला दोन लाडू दिले.



प्र. २. पुढील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा 



(अ) कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या ?

उत्तर - कपाटात हिरवी पारदर्शक काचेची दौत, तांबड्या मेणबत्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे ,निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली हात मोडलेली काचेची बाहुली ,अंग दाबताच कुई आवाज करणारे रबरी बदक आणि रंगीत खडूंचा डबा, इतक्या गमतीच्या वस्तू कपाटात होत्या.


(आ) बिम्मनेचे बब्बीचे चित्र कसे काढले होते?

उत्तर - बिम्मने बब्बीच्या चित्रात काड्यांप्रमाणे उंच पाय असलेली, रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती व डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेण्या दोन्ही बाजूंना ताठ होत्या. तिच्या हातात दप्तर होते. व तिच्या पायावर बेडकी काढली होती. 


(इ) हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ' असे आई का म्हणाली ?

उत्तर - बिम्मने स्वतःचे व आईचे असे चित्र काढले होते ज्यामध्ये आई बिम्मला लाडू देत आहे. यावर आई मोठ्याने हसू लागली व बिम्मची लाडू खाण्याची इच्छा ओळखून बिम्मला लाडू दिले यावरून हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ' असे आई का म्हणाली.



प्र. ३. का ते लिहा.


(अ) बब्बीने दणादण पावले आपटली-

उत्तर - बिम्मने तिला चिडवण्यासाठी तिच्या चित्रात पायावर बेडकी काढली, म्हणून बब्बिने दणादण पावले आपटली. 


(आ) थोडयाच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली.

उत्तर - थोडयाच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली; कारण बिम्मने फरशीवर भराभर चित्रे काढली.


(इ) आई मोठ्याने हसू लागली

उत्तर - बिम्मला आई लाडू देत आहे' असे चित्र बिम्मने काढले. यावरून बिम्मला लाडू हवे आहेत, हे समजल्यावर आई मोठ्याने हसू लागली.



प्र. ४. बिम्मने काढलेल्या चित्रांची यादी करा.

उत्तर - 

१) हत्तीचे चित्र 

२) घर व घराबाहेर आई, बाबा, बब्बी,बिम्म आजोबा, 

३) शाळा 

४) बाजार व तीन कोंबडे

५) बब्बीचे चित्र 

६) बिम्मला लाडूचा ढीग देताना आई


प्र. ५. वाक्यांत उपयोग करा. 


(अ) चेहरा उतरणे.

वाक्य - लाडू न मिळाल्याने बंडुचा चेहरा उतरला.


(आ) कपाळाला हात लावणे.

वाक्य - लहान चिंटूने नवीन कप फोडला म्हणून आईने डोक्याला हात लावला.


(इ) गाडग्यासारखे तोंड करणे.

वाक्य - समीरच्या हातातून खाऊ हिसकवल्यामुळे त्याने तोंड गाडग्यासरखे केले.




प्र. ७. खालील शब्दांना 'कार' जोडून शब्द लिहा.

उदा., चित्र चित्रकार


अ) शिल्प - शिल्पकार 

आ) नाटक - नाटककार 

इ) संगीत - संगीतकार

ई) कला - कलाकार










Post a Comment

Previous Post Next Post