१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर - गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडातील शेंडगाव येथे एका गरीब घरात झाला.
(२) डेबूला कशाची हौस होती ?
उत्तर - कोणतेही काम मनापासून व नीटनेटके करण्याची डेबूला हौस होती.
(३) डेबूचा जीव का तुटत होता?
उत्तर - काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता.
(४) वयाच्या कितव्या वर्षी गाडगेबाबांनी घरदार, सग्यासोयऱ्यांचा त्याग केला?
उत्तर - वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरदार, सग्यासोयऱ्यांचा त्याग केला..
(५) कीर्तन संपले की गाडगेबाबा काय करीत ?
उत्तर - कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर गाडगेबाबा गर्दीतून पळून जात.
प्रश्न २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा
(१) लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नसे ?
उत्तर - लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते. कर्ज काढून सण साजरे करीत होते. रोगराई झाली, तर औषध न देता देवाला नवस करीत होते. कॉबडे-बकरे यांचे बळी देत होते. लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नसे.
(२) गाडगे महाराजांनी मनाशी काय ठरवले ?
उत्तर - चार चांगल्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर कुणी आपले ऐकत नाही, हे गाडगेबाबांच्या लक्षात आले. आई आपल्यासाठी कष्ट करते, म्हणून आपण तिचे ऐकतो. याचा विचार करून, आपण लोकांसाठी अतोनात कष्ट करायचे; म्हणजे लोक आपले ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल, असे गाडगेबाबांनी मनाशी ठरवले.
(३) गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे?
उत्तर - गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना कीर्तनातून सांगायचे की, माझ्या लेकरांनो देव आपल्यातच आहे त्याला जाग करा.
(४) गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे?
उत्तर - ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगेबाबा जायचे तेथे खराटे, फावडी, घमेले गोळा करायचे. मग सर्व गाव झाडून काढायचे. शेणाने सारवून स्वच्छ करायचे.
(५) गाडगेबाबांची देवपूजा कोणती?
उत्तर - दुःख दिसले की बाबा तिथे धावत. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले, की बाबा तिथे हजर! स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा दयायचे. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोक. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा
प्र. ३. खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा.
(१) लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून पळ काढत.
(२) सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायांखाली घातला.
(३) आम्ही जवळ जाताच खार पसार झाली.
(४) माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटू लागला.
(५) खेळताना मार लागला, तरी मुले पर्वा करीत नाहीत.