प्र. १. नातेसंबंध लिहा.
(अ) विठ्ठल उमप - भिकाजी तुपसौंदर = मित्र
(आ) जयवंता बाय - अण्णा भाऊ साठे = पती पत्नी
(इ) अण्णा भाऊ - गॉर्की = शिष्य गुरू
प्र. २. आकृत्या पूर्ण करा.
(अ) अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष
उत्तर -
१. साधे राहणीमान पण उच्च विचारसरणी
२. वास्तववादी साहित्य रचनाकार
३. गरिबांबद्दल द्या
४. पैशांचा तिळमात्रही मोह नसलेले
(आ) झोपडीतील वास्तव
उत्तर -
१. गळकी झोपडी, झोपडीमध्ये साचलेले पाण्याचे डबके
२. एक तांब्या, एक जरमनच ताट, एक डेचकी
३. मोडका टेबल, , मोडकी खुर्ची, चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकड
प्र. ३. एका शब्दात उत्तरे लिहून चीकट पूर्ण करा.
(अ) अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण
उत्तर - चिरागनगर
(आ) विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन
उत्तर - ट्रांझिस्टर
(इ) अण्णांच्या कादंबन्या अनुवादित झाले ते शहर
उत्तर - मॉस्को
प्र.४. उत्तरे लिहा.
(अ) अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर - अण्णा भाऊ साठे यांचे राहणीमान खूप साधे होते. त्यांच्या अंगावर मळके गंजीफ्राक असायचे ते छोट्याश्या झोपडीमध्ये राहत होते. ती ही गळकी होती झोपडीतच डबकी साठलेली असायची. त्यांच्या जवळ एक तांब्या, एक जरमनच ताट, एक डेचकी इतक्यातच त्यांचा संसार होता. लिखाणही ते मोडक्या टेबलावर, तुटक्या खुरचीमध्ये बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लाऊन करत असे.
(आ) अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर - अण्णाभाऊंना विठ्ठल उमप यांच्या रचना फार आवडायच्या त्यांच्या रचना त्यांनी खूप वेळा आकाशवाणीवर ऐकल्या होत्या. त्यांचा बुलंद पहाडी आवाज अण्णा भाऊंना खूप आवडतं होता. विठ्ठल उमप यांच्या वागणुकीची, वर्तनुकीची माहिती त्यांना इतरांकडून मिळाली होती. या सर्व गुणांमुळे अण्णा भाऊंना विठ्ठल उमप यांना भेटण्याची ओढ लागली होती. म्हणुन ज्या दिवशी विठ्ठल उमप अण्णा भाऊंना भेटले त्यांच्यासाठी तो सुदिन होता.
(इ) पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
उत्तर - विठ्ठल उमप हे नामवंत शाहीर होते. त्यांच्या रचना लोक आकाशवाणीवर ऐकत. त्यांचा बुलंद पहाडी आवाज सर्वांना भावत असे. विठ्ठल उमप जेव्हा पहिल्यांदा अण्णांना भेटले तेव्हां त्यांनी अण्णा भाऊंचा संसार डोळ्यांनी पाहिला. तेव्हा त्यांना त्यांची परिस्थिती बघून वाईट वाटले. एकदा एक प्रकाशक त्यांना त्यांच्या कथांच्या बदल्यात ट्रान्झिस्टर देऊन गेला हे पाहून अण्णांना त्यांच्या कलेचा योग्य मोबदला मिळत नाही हे वाटत होते. यावरून त्यांचा अण्णा भाऊंविषयी चा आदर दिसून येतो.
(ई) प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.
उत्तर - अण्णा भाऊ हे एक नामवंत शाहीर, लेखक होते. अण्णा भाऊंना विठ्ठल उमप यांच्या रचना खूप आवडायच्या. त्यांचा पहाडी आवाज त्यांना आवडत असे. यावरून त्यांचे साहित्याविषयीचे प्रेम दिसून येते. विठ्ठल उमप यांनी त्यांच्या पहिल्या भेटीमध्ये त्यांनी बघितलेले त्यांच्या झोपडीतील परिस्थिती पाठात मांडली आहे यावरून त्यांचे राहणीमान किती साधे असेल याची कल्पना येते.
प्रकाशक त्यांना त्याच्या लेखनाचा मोबदलाही योग्य देत नव्हते. त्यांच्या कादंबऱ्यांचे भाषांतर मॉस्को मध्ये झाले होते तेथून त्यांना खूप पैसा मिळवता आला असता पण त्यांनी तसे केले नाही त्यांनी उलट त्यांचे म्हणणे होते “विठ्ठला, बंगला, मोटर, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आरामखुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही. अरे, झोपड्यात दीनदलितांची दुःखं मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढूनताणून काल्पनिक लिखाण होईल, झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात, पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी भगुलं, परात कशी लावली जाते, थंडीच्या महिन्यांत दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं, इथं दुःखाला झेलत जगणारी माणसे - त्यांची पालं - त्यांच्या हाणामाऱ्या, विठ्ठल, काय सांगू - अरे, वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन, सत्य लिखाणाला पारखा होईन, म्हणून मला ते मानधन नको." यावरून त्याचे सर्व सामान्य बद्दल चे प्रेम दिसून येते.
खेळूया शब्दांशी.
खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले
उत्तर - जुई, रेहाना, जॉर्ज सहलीला निघाले.
(२) अबब केवढा हा साप
उत्तर - अबब! केवढा हा साप!
(३) आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा
उत्तर - आई म्हणाली, "सर्वांनी अभ्यासाला बसा".
(४) आपला सामना किती वाजता आहे
उत्तर - आपला सामना किती वाजता आहे?
(५) उदया किंवा परवा मी गावी जाईन
उत्तर - उदया किंवा परवा मी गावी जाईन.
इयत्ता आठवी मराठी धडा सातवा स्वाध्याय
आठवी मराठी धडा सातवा
आठवी मराठी स्वाध्याय