प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा
(१) नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते ?
उत्तर - डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात, तेव्हा नदीचे पाणी आणखी वाढते.
(२) मनुलीने कसली पाने पुस्तकात ठेवली ?
उत्तर - मनुलीने पिंपळाची दोन पाने पुस्तकात ठेवली.
(३) बाईंनी कोणती कविता वर्गात शिकवली ?
उत्तर - बाईंनी नदीची कविता वर्गात शिकवली.
(४) बाईंनी कशाचे चित्र काढून आणायला सांगितले?
उत्तर - बाईंनी नदीचे चित्र काढून आणायला सांगितले.
(५) मनुलीच्या मते, पानावरची नदी व खरी नदी कशी पुढे जाते?
उत्तर - मनुलीच्या मते, पानावरची नदी सरळ ओळीत पुढे जाते, पण खरी नदी तिच्यासारखी कशीही धावते.
प्रश्न २. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
(१) झाडं मात्र......... पानांनी टाळ्या वाजवू लागतात.
(२) एखादया डोंगरात नदीचा........ होतो.
(३) ही नदी.......नदी आहे. सरळ ओळीत चाललीय.
(४) मनुली, तू छान ......करतेस हं!
उत्तर
(१) झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात.
(२) एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो.
(३) ही नदी शहाणी नदी आहे. सरळ ओळीत चाललीय.
(४) मनुली, तू छान कल्पना करतेस हं!
प्रश्न ३. कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा
(पुढं पुढं, छोटे छोटे, तरंगत तरंगत, गारगार, उंच उंच)
(१) ...... वाऱ्याच्या झुळकेनं मनुली सुखावली.
(२) पिंपळाची दोन पानं खिडकीतून आत आली.
(३) ..... झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं.
(४) नदी.... जाऊ लागते.
(५) बाजूच्या शिरा म्हणजे..... ओहोळ
उत्तर -
(१) गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली.
(२) पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली.
(३) उंच उंच झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं.
(४) नदी पुढं पुढं जाऊ लागते.
(५) बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ.
प्रश्न ४. एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. उदा., उंच उंच.
असे आणखी शब्द सांगा
उत्तर -
(१) लहान लहान
(२) वाहत वाहत
(३) गप्प गप्प
प्रश्न . विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) सरळ x वाकडे
(२) लांब X जवळ
(३) पुढे x मागे
(४) लहान x मोठे
(५) शांत x अशांत
(६) हसली x रडली
(७) नंतर X आधी
(८) शहाणी x वेडी
(९) सोपे X कठीण
प्रश्न . एक- अनेक लिहा
जसे एक पान अनेक पाने.
(१) एक पुस्तक - अनेक पुस्तके
(२) एक झाड - अनेक झाडे
(३) एक चित्र - अनेक चित्रे
(४) एक ओढा - अनेक ओढे.
प्रश्न. पाठामध्ये 'टोकदार' शब्द आलेला आहे, त्यासारखे शब्द बनवा.
जसे टोक टोकदार.
(१) रुबाब रुबाबदार
(२) समजूत समजूतदार
(३) धार धारदार
(४) पाणी पाणीदार
(५) तजेल तजेलदार
(६) चमक चमकदार.
प्रश्न ४. शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा.
(१) अलगद उचलणे - सावकाश उचलणे.
(२) एकटक पाहणे - एकाच जागी नजर लावून पाहणे.
(३) मोरपीस फिरवल्यासारखे - सौम्य स्पर्श व्हावा तसे.
(४) सुखावणे - आनंद होणे.
(५) दंग असणे - गुंग असणे.
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप फॉर रेगुलर अपडेट
सान्वी सुंदर घाडी
ReplyDelete