सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी Surya ugavala nahi tar nibandh in marathi

 




                    सूर्य उगवला नाही तर सुरुवातीला खूप साऱ्या गंमतीच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील जसे सूर्य उगवणार नाही म्हणजे सकाळ होणार नाही काही लोक उजाडलं नाही म्हणून तशीच झोपून राहतील आणि जेव्हा कळेल की सकाळ तर कधीच झालिये पण सूर्यच उगवला नाही तेव्हा खरी त्यांची झोप उडेल, सगळी कडे नेहमीच काळा किट्ट अंधार असेल यामुळे चोरांना तर सुवर्णसंधी मिळेल , सगळीकडे अंधार असल्यामूळे रस्त्यावर विजेचे दिवे २४ तास पेटलेले असतील, घरातही नेहमीच दिवे लागलेले असतील, सूर्य उगवला नाही म्हणून कडकं उन वगैरे या तक्रारी बंद होतील, सकाळी सकाळी लवकर उठून शाळेत जाणे नाही, कामाला जाणे नाही, हवे तितके झोपणे.

                      पण खरच सूर्य न उगवणे गंमत असेल का? 

चला याचाही विचार करूयात ! सूर्य न उगवल्यामुळे दिवस आणि रात्र होणार नाही यामुळे दिवसाच्या उजेडात जी कामे केली जातात त्यांना मोठा अडथळा निर्माण होईल व कामे ठप्प पडतील. सकाळ कधी होईल हे माहिती नसल्यामुळे सगळे घड्याळीचे गुलाम बनतील. सर्व कामे घड्याळ बघून पार पडतील कारण सकाळ, दुपार, संध्याकाळ या गोष्टी होणारच नाही सगळीकडे कायम अंधारच असेल,सूर्य नसल्याने समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढगे तयार होणार नाही परिणामी पाऊस पडणार नाही आणि सगळी कडे दुष्काळ पडेल आणि विना पाण्याने सर्व प्राणी सृष्टी धोक्यात येईल.  सूर्याच्या ऊर्जेमुळे चालणाऱ्या वस्तू जसे सौरचुल, सूर्याच्या उष्णेपासून होणारी वीज निर्मिती या सर्व गोष्टी बंद पडतील, हळू हळू वातावरणात आपल्याला अचानक गारवा जाणवायला लागेलं आणि हळू हळू थंडी वाजू लागेल ही थंडी इतकी प्रचंड असेल की आपल्याला सहन होणार नाही कारण उष्णता तर सूर्याकडूनच येते ना!  सगळी कडे अंधार असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढेल अंधारात चोरही हातात येणार नाहीत, सूर्य न उगवल्यामुळे सूर्यापासून वनस्पतींची अन्न बनवण्याची प्रक्रिया थांबेल परिणामी आपल्याला ही अन्न, धान्य मिळणार नाही. कोणालाही अन्न न मिळाल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, आणि संपूर्ण मानव जातीवर संकट कोसळेल .

                  सूर्य न उगवणे इतके भयानक असेल की त्याची कल्पनाही करू शकत नाही यामुळे सूर्य उगवला नाही तर हा विचारच मनात नको! 

         



















surya ugavala nahi tar composition in marathi

jar surya ugavala nahi tar nibandh in marathi

surya ugavala nahi tar nibandh in marathi

surya ugavala nahi tar nibandh marathi

surya ugavala nahi tar short essay in marathi

surya ugavala nahi tar essay writing in marathi

surya ugawala nahi tar nibandh

Surya ugawala nahi tar nibandh marathi


Post a Comment

Previous Post Next Post