प्र. १. थोडक्यात उत्तरे सांगा.
(अ) कौलारावर काय पडत आहे?
उत्तर - कौलारावर टपोरे थेंब पडत आहे.
(आ) 'म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का
उत्तर - हरभरे भरडण्याचा आवाज जसा येतो तसाच आवाज ढगाच्या गडगडण्याचा येतो.
प्र. २. काय झाले?
(अ) पडघमवरती टिपरी पडली - तडम तड तड तडम
(आ) ढग गडगडू लागले - गडगड गम
(इ) बीज कोसळली - कडम कड कड कडम
प्र. ३. समानार्थी शब्द वाचा व लिहा.
(अ) मेघ - घन
(आ) वीज - चपला, विद्यूत
(इ) जल - पाणी
(ई) धरती - धरणी, जमीन
प्र. ४. खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा.
उदा. हरभरे भरडण्यासाठी - जातं
(अ) गहू दळण्यासाठी - जात किंवा चक्की
(आ) बाजरी पाखडण्यासाठी - सूप
(ई) ज्वारी चाळण्यासाठी - चाळणी
(इ) मसाला वाटण्यासाठी - पाट आणि वरवंटा
(उ) चहा गाळण्यासाठी - गाळणी
(ऊ) काकडी कापण्यासाठी - चाकू
प्र.५. पडघमवरती टिपरी पडली' असे कवितेत म्हटले आहे. खरेतर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली; पण कवीने पडघमवर टिपरी वाजवली' असे न म्हणता 'टिपरी पडली' असे महटले आहे. आता खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा.
उदा. कुंडीतल्या रोपाचर चुरशी पडली, म्हणजे कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली.
(१) सुभानराव निवडणुकीत पडले
- म्हणजे सुभानरावांचा निवडणुकीत पराभव झाला.
(२) कैरी पिवळी पडली
- म्हणजे कैरी पिकू लागली.
(३) समीरा आजारी पडली
- म्हणजे समीराची तब्येत बिघडली.
(४) खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला. - म्हणजे रमेश नाराज झाला किंवा हिरमुसला.
(५) काल रात्री खूप पाऊस पडला.
- म्हणजे खूप पाऊस कोसळला किंवा भारी वर्षाव झाला.
प्र. ६. 'तत' यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधाय लिहा. तुम्हांला माहीत असलेले नादमय शब्द सांगा.
कवितेतील नादमय शब्द:
१) तडम् तडम्
२) गड्गड्
३) कडकडू
४) कडम् कडम्
५) धरधर
६) सळसळून.
काही नादमय शब्द-
१) बडबड
२)खडखड
३) झडझड
४) घडघड
५) थडथड
६) फडफड
७) तडतड
८) धडधड
प्र. यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा.
१. भित्रा प्राणी
२. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द,
३. उन्हाळ्यात पितात.
४. चौघडा या बादयाबरोबर येणारे दुसरे वादय,
५. उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द,
उत्तर -
शब्दार्थ :
पडघम - एक चर्मवादय (चर्म कातडी) टपोरे मोठे भरडणे - धान्य जाडसर दळणे.
कोसळणे - वेगाने आणि जोराने पडणे जलपाणी,
अंगण - घरापुढची मोकळी जागा
धरती - जमीन,
धरतीचे रंध्र - जमिनीवरील मातीचे बारीक कण
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप फॉर रेगुलर अपडेट
Search with this keywords
इयत्ता तिसरी बालभारती
बालभारती तिसरी अभ्यास
बालभारती तिसरी प्रश्न उत्तरे
बालभारती इयत्ता तिसरी