माझ्या शाळेचे नाव सरस्वती माध्यमिक विद्यालय आहे. आमच्या शाळेला तीन इमारती आहेत व तिनही इमारती तीन मजली आहेत. तिनही इमारती मिळून प्रत्येक मजल्यावर १५ वर्ग आहेत. प्रत्येक वर्गाची पटसंख्या ५०-५५ आहे. आमच्या शाळेच्या मधोमध पटांगण आहे. आमच्या शाळेचे क्षेत्रफळ फार मोठे नाही पण तरीही आमची शाळा आजूबाजूच्या शाळेंपेक्षा प्रसिद्ध आहे.
मी आता इयत्ता ७ वी मध्ये शिकत आहे आमच्या वर्गशिक्षकाचे नाव गायकवाड सर आहे. ते फार कडक आहेत पण त्यांची शिकवण्याची पद्धत अगदी उत्तम आहे. तसेच इतर विषयांचे शिक्षक पाटील सर, आमले बाई, बनसोडे बाई, शेळके बाई, कांबळे सर, भोसले सर, हे सर्व त्यांच्या विषयांमध्ये खूप हुशार आहेत.
आमच्या शाळेची वेळ सकाळी ७ ते १२:२० अशी आहे. सकाळी आल्यावर सर्वात आधी परिपाठ होतो सुरुवातीला राष्ट्रगीत म्हटले जाते मग प्रतिज्ञा म्हटली जाते व यानंतर प्रार्थना होते तसेच समूहगीतही म्हटले जाते यानंतर नेहमीप्रमाणे शाळेचे तास सुरू होतात. ९:३० ते १०:०० पर्यंत मधली सुट्टी असते. आमच्या शाळेत खिचडीचे वितरण केले जाते यासाठी उत्कृष्ट तांदूळ वापरले जातात. तसेच खिचडी सर्वांना फार आवडते. मधल्या सुट्टीनंतर सर्व तास होतात आणि शेवटी जाताना वंदे मातरम् म्हटले जाते. शुक्रवार आणि शनिवार पीटी चा तास होतो. सर्व मुलांना पटांगणात खेळायला मिळते.
आमच्या शाळेत मुलांच्या कलागुणांना वाव दिली जाते यासाठी अनेक स्पर्धा होतात जसे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नाटक, नृत्य स्पर्धा यासर्वांमध्ये मुले आवडीने भाग घेतात. गॅदरिंग मध्ये शाळेत विशेष मजा येते.
आमची शाळा सर्व दिनविशेष साजरी करते जसे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, शिक्षक दिन, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी इत्यादी
आमचे शिक्षक शिस्त आणि अभ्यासच्या बाबतीत कडक आहेत जर दिलेला घरचा अभ्यास पूर्ण केला नाही तर दुसऱ्या दिवशी हातावर छड्या खाव्या लागतात. पण ते तितकेच प्रेमळ ही आहेत ते आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करतात. आम्हाला आमच्या भविष्यात येणाऱ्या गोष्टींची ओळख करून देतात. ऑफ तासाला खरी मज्जा येते वांगेकर सर तर गोष्टींचा खजिनाच आहे ते ज्या गोष्टी सांगतात त्या संपूच नये अशा वाटतात खूप विनोदी व रोमांचक असतात त्यांच्या गोष्टी. शिक्षक आम्हाला नेहमी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.
आमची शाळा ही खूप सुंदर आहे पण आमचे शिक्षकच शाळेला अजून सुंदर बनवतात माझी शाळा मला खूप आवडते जी मला माझ्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देते.