* कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा.
(सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयुज, आयनिक, अष्टक, विक, आदान-प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह)
अ. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये ......काढतात.
उत्तर - बाण
आ. लोखंडाचे गंजणे हा....होणारा रासायनिक बदल आहे.
उत्तर - सावकाश
इ. अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट.......निर्माण होतो त्यावरून ओळखता येते.
उत्तर - वास
.
ई. परीक्षानळीतील कॅल्शिअम हायड्रॉक्साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण .... होते.
उत्तर - दुधाळ
उ. लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे
होतात, म्हणजेच हा..... बदल आहे.
उत्तर - रासायनिक
ऊ. श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक......आहे.
उत्तर - अभिकारक
ए. सोडिअम क्लोराइड हे संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे. ......संयुग आहे.
उत्तर - आयनिक
ऐ. हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन...... पूर्ण असते.
उत्तर - द्विक
ओ. क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे....... होऊन Cl2 हा रेणू तयार होतो.
उत्तर - संदान
* शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा.
अ. श्वसन हा एक रासायनिक बदल आहे.
उत्तर -
श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी जैविक प्रक्रिया आहे. ह्या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साइड वायू व पाण्याची वाफ बाहेर पडतात. सखोल अभ्यासानंतर समजते की श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड व पाणी हे तयार होतात. या रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरण पुढीलप्रमाणे आहे. (येथे रासायनिक समीकरणाचे संतुलन केलेले नाही)
शाब्दिक समीकरण :
ग्लुकोज + ऑक्सीजन
---> श्वसन ---> कार्बनडायऑक्साइड + पाणी
आ. धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्फेन पाणी सुफेन होते.
उत्तर-
काही विहिरींचे किंवा कुपनलिकांचे पाणी दुष्फेन असते. ते चवीला मचूळ लागते व त्यात साबणाचा फेस होत नाही. याचे कारण दुष्फेन पाण्यात कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे क्लोराइड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. हे दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो. पाण्यातील विरघळलेले कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे क्षार कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते.
इ. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकल्यावर चुनखडी चूर्ण दिसेनासे होते.
उत्तर -
विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये चुनखडी पूड टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते. द्रावणीय कॅल्शिअम क्लोराइड, पाणी व कार्बन डायऑक्साइड (CO2) वायू तयार होतात. अशा प्रकारे चुनखडी पूड विरघळते व ती दिसेनाशी होते.
शाब्दिक समीकरण
कॅल्शिअम कार्बोनेट + हायड्रोक्लोरिक आम्ल ------> कॅल्शिअम क्लोराइड + कार्बन डायऑक्साइड + पाणी
ई.खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर बुडबुडे दिसतात.
उत्तर -
खाण्याच्या सोड्याच्या चूर्णांवर लिंबाचा रस टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते. लिंबाच्या रसामधील सायट्रिक आम्लाची खाण्याच्या सोड्यामधील सोडिअम बायकार्बोनेट या रासायनिक घटकाबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू बुडबुड्याच्या स्वरूपात तयार होताना दिसतो.
शाब्दिक समीकरण
सायट्रिक आम्ल (लिंबू रस) + सोडिअम कार्बोनेट (खाण्याचा सोडा)
-----> कार्बन डायऑक्साइड + सोडिअम सायट्रेट
* जोड्या जुळवा.
अ. प्रकाशसंश्लेषण - रासायनिक बदल
आ. पाणी - सहसंयुज बंध
इ. सोडिअम क्लोराइड - आयनिक संयुग
ई. पाण्यात मीठ विरघळणे - भौतिक बदल
उ. कार्बन - ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक
ऊ. फ्लुओरिन - ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती
ए. मॅग्नेशिअम - इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती
* घटक पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन संरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा.
अ. सोडिअम क्लोराइड
उत्तर
(11)Na - 2,8,11 (17)Cl - 2,8,7
सोडिअमच्या संयुजा कवचात एक इलेक्ट्रॉन असल्याने त्याची संयुजा एक व क्लोरीनच्या संयुजा कवचात सात इलेक्ट्रॉन म्हणजे अष्टकाला एक कमी म्हणून क्लोरिनची संयुजा सुद्धा एक हा संबंध आपण पाहिला. सोडिअमचा अणू त्याच्या 'M' ह्या कवचातील एकमेव संयुजा इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याचे उपांत्य कवच 'L' हे बाह्यतम कवच होते. त्यामध्ये आठ इलेक्ट्रॉन आहेत. परिणामतः आता सोडिअमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त होते, मात्र आता इलेक्ट्रॉनांची संख्या 10 झाल्यामुळे सोडिअमच्या केंद्रकावरील +11 ह्या धनप्रभाराचे संतुलन होत नाही व निव्वळ +1 इतका धनप्रभार असलेला Na+ हा धनआयन तयार होतो. याउलट क्लोरिनच्या संयुजा कवचात अष्टक स्थितीपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी आहे. बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर क्लोरिनचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होते, मात्र उदासीन क्लोरीन अणूवर एका इलेक्ट्रॉनची भर पडल्यामुळे प्रभार संतुलन बिघडते व निव्वळ -1 इतका ऋणप्रभार असलेला CI- हा ऋण आयन तयार होतो.
आ. पोटॅशिअम फ्लुओराइड
उत्तर
१) पोटॅशिअमचा अणुअंक 19 आहे व पोटॅशिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 8, 1 आहे.
२) पोटॅशिअम (K) अणूमध्ये बाह्यतम कवचात एक इलेक्ट्रॉन असतो.
३) पोटॅशिअम अणू N कवचातील एक इलेक्ट्रॉन गमावतो व M कवच हे बाह्यतम कवच होते व या कवचाचे स्थिर अष्टक असते.
पोटॅशिअमच्या केंद्रकात प्रोटॉन्सची संख्या 19 असते; मात्र 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या 18 होते. परिणामी एक धनप्रभार अधिक होऊन पोटॅशिअमचा धनप्रभारित आयन (K+) तयार होतो.
४) फ्लुओरीनच्या अणूत बाह्यतम कवचात सात इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता एक इलेक्ट्रॉनची गरज असते.
५) अशा रितीने पोटॅशिअमचा अणू एक इलेक्ट्रॉन फ्लुओरीनच्या अणूला देतो.
६) जेव्हा फ्लुओरीनचा अणू एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा फ्लुओरीनचे अष्टक पूर्ण होते व फ्लुओरीनचे K, L या कवचांमध्ये मिळून इलेक्ट्रॉनची संख्या एकूण 10 होते. पण केंद्रकामधील प्रोटॉन्स संख्या मात्र 9 एवढीच राहते. यामुळे फ्लुओरीन अणूचे फ्ल्युअराइड ऋणप्रभारित आयनाची (F-) निर्मिती होते.
७)फ्लुओरीनचा अणू एक इलेक्ट्रॉन पोटॅशिअमकडून स्वीकारून फ्लुओराइड ऋणप्रभारित आयन व पोटॅशिअम अणू एक इलेक्ट्रॉन देऊन पोटॅशिअमचा धनप्रभारित आयन तयार होतात.
८)पोटॅशिअम आयन आणि फ्लुओराइड आयनांवर विरुद्ध प्रभार असल्याकारणाने तीव्र आकर्षणाचे बल तयार होते. परिणामी त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोव्हॅलंट किंवा आयनिक बंध तयार होतो व पोटॅशिअम फ्लुओराइड (KF) आयनिक संयुग तयार होते.
इ. पाणी
उत्तर
ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचात सहा इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टकापेक्षा दोन इलेक्ट्रॉन कमी आहेत व ऑक्सिजनची संयुजा '2' आहे. H2O रेणूमध्ये ऑक्सिजन अणू दोन सहसंयुज बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो. ऑक्सिजनचा एक अणू हे दोन सहसंयुज बंध दोन हायड्रोजन अणूंबरोबर प्रत्येकी एक याप्रमाणे करतो. हे होताना दोन्ही हायड्रोजन अणूंचे इलेक्ट्रॉन व्दिक स्वतंत्रपणे पूर्ण होते.
ई. हायड्रोजन क्लोराइड
उत्तर
१) हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे व इलेक्ट्रॉन संरूपण 1 आहे म्हणजे हायड्रोजनच्या (H) अणूमध्ये K या बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे आणि याचे द्विक पूर्ण होण्याकरिता इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणून हायड्रोजनची संयुजा 1 आहे.
२) क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 7 आहे. क्लोरीनच्या अणूला बाह्यतम कवचात सात इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता एक इलेक्ट्रॉनची गरज असते.
३) हायड्रोजनचा एक अणू व क्लोरीनचा एक अणू एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संदान करतात. यामुळे हायड्रोजनचे द्विक व क्लोरीनचे अष्टक पूर्ण होते व दोन संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संदानाने त्यांच्यामध्ये सहसंयुज बंध तयार होतो.
Tags
आठवी सामान्य विज्ञान