खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा. त्यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात त्यांच्या पुढे स्थायू, द्रव, वायू यांपैकी योग्य पर्याय लिहा.
सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू ( ) बरोबर खेळत आहेत. गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळपाणी ( ) आणले. तेवढ्यात वारा ( ) वाहू लागला आणि पाऊस ( ) देखील पडू लागला. त्या पटकन घरात ( ) आल्या. आपले कपडे ( ) बदलले आणि आईने त्यांना एक-एक कप ( ) गरम दूध ( ) प्यायला दिले.
उत्तर
स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू (स्थायू) बरोबर खेळत आहेत. गार्गीला तहान लागली; म्हणून रियाने तिच्यासाठी नारळपाणी (द्रव) आणले. तेवढ्यात वारा (वायू) वाहू लागला आणि पाऊस (द्रव) देखील पडायला लागला. त्या पटकन घरात (स्थायू) आल्या. आपले कपडे (स्थायू) बदलले आणि आईने त्यांना एक-एक कप (स्थायू) गरम दूध (द्रव) प्यायला दिले.
पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करा.
(पाणी, काच, खडू, लोखंडी गोळा, साखर,मीठ, पीठ, कोळसा, माती, पेन, शाई, साबण)
उत्तर -
१) पाणी -
१) पाणी हा द्रव पदार्थ आहे.
२) घनरूपात त्याचे बर्फ बनते.
३) वायुरूपात त्याचे बाष्प बनते.
४) पाण्याचा उत्कलनांक आणि संघनन बिंदू १०० °C आहे.
५) पाण्याचा गोठण बिंदू आणि विलयन बिंदू 0° 'C आहे.
६) पाण्यात बरेच पदार्थ विद्राव्य असतात. म्हणून त्याला 'वैश्विक द्रावक' असे म्हणतात.
२) काच -
१) काच हा घन पदार्थ आहे.
२) वाळू वितळवून काच तयार केली जाते.
३) ठिसूळपणा हा काचेचा गुणधर्म आहे.
४) काचेवर दाब दिला असता, तिचे बारीक बारीक
कणांत रूपांतर होते.
(३) खडू -
१) खडू हा घन पदार्थ आहे.
२) खडू पाण्यात अविद्राव्य आहे.
३) ठिसूळपणा हा खडूचा गुणधर्म आहे.
४) खडूवर दाब दिला असता, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात.
४) लोखंडी गोळा -
१) लोखंड हा स्थायू धातू आहे.
२) लोखंडात वर्धनीयता आणि तन्यता असते.
३) त्यापासून पत्रे आणि तारा बनवता येतात. अनेक प्रकारची अवजारे त्यापासून तयार करतात.
४) लोखंडामध्ये उष्णतावाहकता आणि विद्युतवाहकता असते, तसेच नादमयता देखील असते.
५) साखर -
१) साखर हा कणरूप स्थायू पदार्थ आहे.
२) साखर पाण्यात विद्राव्य आहे.
३) चवीला गोड असलेल्या साखरेचे विरघळल्यावर द्रावण बनते.
(६) मीठ -
१) मोठ हा कणरूप स्थायू पदार्थ आहे.
२) मोठ पाण्यात विद्राव्य आहे; परंतु रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे.
३) चवीला खारट असलेल्या मिठाचे विरघळल्यावर द्रावण बनते.
(७) पीठ -
१) पीठ हा कणरूप स्थायू पदार्थ असून, ते धान्य दळल्यावर तयार होते.
२) पीठ पाण्यात अविद्राव्य असते.
३) पिठात पाणी कालवून त्याचा स्थायू पदार्थ बनतो.
८) कोळसा -
१) कोळसा हा स्थायू पदार्थ ज्वलनशील असतो.
२) कोळसा ठिसूळपणा दर्शवतो. त्याच्यावर दाब दिल्यास त्याची भुकटी होते.
३) कोळशाचा इंधन म्हणून वापर करतात.
९) माती -
१) माती हा घन पदार्थ आहे.
२) मातीत अनेक विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ असतात.
१०) पेन -
१) पेन हे धातू आणि प्लास्टिकपासून बनवलेले असते.
२) त्यात शाईचे द्रावण भरलेले
असते.
११) शाई -
१) शाई हा द्रव पदार्थ आहे.
२) हे रंगीत द्रावण आहे.
१२) साबण -
१) सावण हा निरनिराळ्या स्वरूपांत मिळतो. काही साबण द्रवरूपात असतात.
२) काही साबणाच्या वड्या असतात, तर काही साबण चूर्णांच्या स्वरूपात असतात.
३) साबण पाण्यात विद्राव्य असतात. त्यांच्यापासून साबूचे द्रावण बनते.
संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा.
उत्तर -
स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात.
उदा. कापूर
५. कशापासून बनवतात ते सकारण लिहा.
१) ऊस तोडण्याचा कोयता-
ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून किंवा अन्य धातूंपासून बनवलेला असतो. कठीणपणा, वर्धनीयता आणि तन्यता हे धातूचे गुणधर्म लोखंडात असल्याने, त्याचा वापर कोयता करण्यासाठी केला जातो. ऊस तोडण्याचे काम करण्यासाठी दणकट अवजाराचीच आवश्यकता असते. म्हणून कोयता लोखंडासारख्या धातूंचा बनवलेला असतो..
२) घरावर लागणारे पत्रे -
घरावर घालण्यात येणारे पत्रे हे अॅल्युमिनिअम या धातूचे असतात. अॅल्युमिनिअम हे वजनाने हलके असूनही, टिकाऊ आणि कणखर असते. त्याच्यावर गंज चढत नाही. त्यामुळे उन-पावसापासून घराचे संरक्षण होते.
३) स्क्रू ड्रायव्हर -
स्क्रू ड्रायव्हर चांगल्या प्रतीच्या शक्तिशाली पोलादापासून बनवलेला असतो. त्यामुळे त्याचा वापर जोडणीसारख्या कठीण कामातही सुलभपणे करता येतो.
४) पक्कड पक्कड़ -
स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते. पूर्वीच्या काळी पोलादी किंवा लोखंडापासून बनवलेल्या पकडी असत. स्वयंपाकाची गरम भांडी उतरवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
तर दुसऱ्या प्रकारच्या पकड ह्या भिंतीत ठोकलेले खिळे खेचून काढण्यासाठी किंवा तार तोडण्यासाठी वापरली जाते. बहुतेक वेळा अशी पक्कड इलेक्ट्रिशियन आणि सुतार वापरतात. ही पक्कड लोखंडी असते कारण अशी कामे करायला कठीण धातूची आवश्यकता असते.
५) विजेच्या तारा -
विजेच्या तारा तांबे किंवा अॅल्युमिनिअम या धातूच्या बनवलेल्या असतात. तांबे हे जलद गतीने विजेचे वहन करते. तांबे या धातूच्या विदयुतवाहकता या गुणधर्मामुळे ते विशेषतः विजेच्या तारांत
६) दागिने -
सोने किंवा चांदीपासून दागिने बनवतात. हल्ली प्लॅटिनम या धातूचा वापरही दागिन्यांसाठी केला जातो. हे सर्व धातू असून, त्यांत तन्यता हा गुणधर्म असतो. त्यामुळे त्यांच्या तारा बनवता येतात. सोने व चांदीला लकाकी असते.
७) पातेले -
पातेले हे निरनिराळ्या धातूंपासून बनवले जाते. अॅल्युमिनिअम, स्टेनलेस स्टील किंवा पितळेपासून बनवलेल्या पातेल्यांत अन्न शिजवणे सोपे असते; कारण या धातूंमध्ये उष्णतावाहकतेचा गुणधर्म असतो. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात अन्नावर धातूपासून रासायनिक प्रक्रिया होत नाहीत. म्हणून ते वापरणे सुलभ आहे.
असे केले तर काय होईल आणि का?
अ. खिळे प्लॅस्टिकचे बनवले
उत्तर
१) प्लास्टिक हा ठिसूळ पदार्थ आहे
२) यामुळे असा खिळा कोठेही आपण बसवू शकत नाही तर लगेच वाकेल कारण त्यात कठिणपणा हा गुणधर्म नाही
२) लोखंडी खिळ्यांमध्ये हा गुणधर्म असतो
आ. घंटा लाकडाची बनवल
उत्तर
१) जर घंटा लाकडाची असली तर त्यात कंपन होणार नाही
२) लाकडा मध्ये नादमयता हा गुणधर्म नसतो
इ. पक्कडला रबर बसवले नाही
उत्तर
१) पकडाच्या साहाय्याने आपण वस्तू उचलतो ठेवतो
२) जर रबर नसेल तर उष्णतावाहन होऊन आपल्याला चटका लागू शकतो
३) किंवा ज्या पकड इलेक्ट्रिक कामासाठी वापरल्या जातात त्यांना रबर नसेल तर शॉक लागू शकतो
ई. चाकू लाकडाचा तयार केला
उत्तर -
१) चाकू लाकडाचा असेल तर वस्तू कापणे शक्य होणार नाही
२) कारण चाकू हा ज्या धातूने बनतो त्याला कठिणपणा असतो लाकडाला नसतो
उ.कुऱ्हाड रबराची बनवली
उत्तर -
१) कुऱ्हाड रबराची बनवली तर
२) लाकडे कापुच शकत नाही
३) कारण लोखंडी कुऱ्हाडी मध्ये जो कठिणपणा असतो तो रबरामध्ये नसेल
७. मी कोण?
अ. तुमचा ताप मोजतो, तापमापीत असतो.
उत्तर - पारा
आ. माझ्याशिवाय गरम नाही, थंड नाही.
उत्तर - उष्णता
इ. नाही मला आकार !
उत्तर - द्रव्य, वायू
ई. पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही.
उत्तर - मीठ
८. असे का झाले?
अ. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले.
उत्तर
१) हिवाळ्यात तापमान कमी असते
२)खोबऱ्याच्या तेलाचा गोठण बिंदू आल्यामुळे ते गोठते
आ. प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले.
उत्तर -
१) उघड्यावर ठेवलेले रॉकेल चे जास्त तापमान असल्यावर बाष्पीभवन होते
२) यामुळे ते काही वेळात नाहीसे होऊन जाते
इ. एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला.
उत्तर
१) अगरबत्तीचा वास हा वायू स्वरूपात असतो
२) जेव्हा हा वायू एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपर्यापर्यंत पसरत असल्याने आपल्याला वास येतो
ई.
उत्तर -
फुग्याचे वजन कमी असते कारण त्यात वायू असतो म्हणून तो पाण्यावर तरंगतो त्यामानाने सफरचंदाची घनता जास्त असते त्यामुळे तो पाण्यात बुडतो