योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
अ. व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर......पदार्थ आहे.
उत्तर - मानवनिर्मित टणक
आ. नैसर्गिक पदार्थोंवर .......करून मानवनिर्मित हा कृत्रिम धागा पदार्थ तयार केले जातात.
उत्तर - प्रक्रिया
इ. न्यूयॉर्क व लंडन येथे.....तयार झाला.
उत्तर - नायलॉन
ई. रेयॉनला.......नावाने ओळखले जाते.
उत्तर - कृत्रिम रेशीम
उत्तरे लिहा.
अ. मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली ?
उत्तर -
दैनंदिन जीवन अधिक सोपे व्हावे , म्हणून नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले. असे काही पदार्थ वापरायला अधिक सोईचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. म्हणून मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप मोठी आहे.
आ. निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात ?
उत्तर
वनस्पतिजन्य पदार्थ - कापूस, साग, लाकूड, फळे, फुले
प्राणीजन्य पदार्थ - रेशीम, लोकर, मोती, चामडे
इ. व्हल्कनायझेशन म्हणजे काय ?
उत्तर
या पद्धतीमध्ये रबर गंधकाबरोबर तीन-चार तास तापवले जाते. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकाचे प्रमाण ठरते.
ई. नैसर्गिकरीत्या कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात ?
उत्तर -
कापूस, रेशीम, लोकर, तांबडी, ताग इत्यादी
३. आमचे उपयोग काय आहेत ?
अ. माती
उत्तर
१) माती मुळेच आपण शेती करतो ज्यामुळे आपल्याला अन्न मिळते
२) माती पासुन भांडी, चूल, कुंड्या, विटा , कौले अनेक उपयोगी गोष्टी तयार होतात.
आ. लाकूड
उत्तर -
१) लाकडापासून लाकडी दरवाजा, खिडक्या व अनेक शोभेच्या वस्तू बनवल्या जातात
२) बांधकामाच्या ठिकाणी लाकडाचा उपयोग केला जातो
३) लाकडापासून इंधन मिळते
इ. नायलॉन
उत्तर -
१) टिकाऊ दोऱ्या ,वस्त्रे यापासून बनवल्या जातात
२) मासेमारीसाठीचे जाळी ही नायलॉन पासून बनते
ई. कागद
उत्तर -
१) कागदापासून वह्या, पुस्तके तयार होतात
२) पॅकिंग साठी देखील कागदाचा उपयोग होतो
3. रबर
उत्तर -
१) रबरापासून आपल्याला अनेक फायदे आहेत
२) जसे गाडीचे टायर , खोडरबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी इत्यादी
४. कागदनिर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर -
१)कागद बनवण्यासाठी पाइनसारख्या सूचिपर्णी वृक्षांचा उपयोग होतो.
२)या वृक्षांच्या लाकडांच्या ओंडक्यांची साल काढून त्यांचे बारीक तुकडे करतात.
३) हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जाते. त्यामुळे त्यांचा लगदा तयार होतो.
४) रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात.
५) त्यांमध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात व रोलर्समधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो.
५. कारणे लिहा.
अ. उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.
उत्तर -
१) सुती कपडे हे कापसाच्या धाग्यांपासून बनतात
२) यामुळे उन्हाळ्यात शरीराचा घाम शोषला जातो
आ. पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी.
उत्तर -
१) काही पदार्थ जे आपल्याला निसर्गातून प्राप्त होतात त्यांचा साठा कमी असतो यामुळे त्यांचा वापर हा योग्य प्रमाणात करायला हवा
उदा. कागद निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात.
२) तसेच प्लास्टिक हे जास्त प्रमाणात वापरणे हे पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकते कारण प्लास्टिक हे विघटनशिल नाही त्याचे विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो
इ. कागद वाचवणे काळाची गरज आहे.
उत्तर -
१) कागद निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात.
२) झाडे ही पर्यावरणाच्या संतुलनाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत.
३) यामुळे निसर्ग वाचवण्यासाठी झाडे वाचवा, झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवा. त्यासाठी कागदाचा वापर योग्य व काटकसरीने करा. कागदाचा पूर्ण वापर करा आणि कागदाचे पुनर्चक्रीकरण करा.
ई. मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे.
उत्तर -
१) मानवनिर्मित पदार्थ हे मुबलक, कमी खर्चाचे, सुलभ असतात
२) यामुळे मानवनिर्मित पदार्थ ही जास्त उपयोगी ठरतात
३) उदा. कृत्रिम वस्त्रे, प्लास्टिक, इत्यादी
उ. कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे.त्
उत्तर
१) मृदेत विघटन करणारे जिवाणू आणि इतर सजीव असतात
२) यामुळे मृतावशेषांचे रूपांतर खतात होते
३) या प्रक्रियेमुळे कृथित मृदा नैसर्गिक रीत्या तयार होते
४) म्हणून कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे.
६. कसे मिळवतात याची माहिती मिळवा.
१. लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात ?
उत्तर
१) लाख हा पदार्थ लाखेच्या किड्यांपासून मिळवतात.
२) मादीच्या एका ठरावीक ग्रंथीतून रेझिनप्रमाणे एक द्रव पाझरतो.
३) हा द्रव हवेच्या संपर्कात आल्यावर त्यापासून लाख तयार होते.
२. मोती हे रत्न कसे मिळवतात ?
उत्तर -
१) मोती हे रत्न शिंपल्यात बनते. नैसर्गिकरीत्या कोणताही परकीय कण काही प्रजातींच्या शिंपल्यांत शिरला की, त्याच्या सभोवताली कॅन्कर नावाच्या पदार्थाचे थर टाकले जातात. त्यातून मोती तयार होतो.
२) कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत पर्ल ऑयस्टर या शिंपल्यासारख्या प्राण्याच्या शरीरात मणीवजा वस्तू टाकली जाते आणि त्याच्या वर हा प्राणी कॅन्करची आवरणे टाकतो. अशा रितीने कल्चर्ड मोती तयार केला जातो.