प्र. १. खालील आकृती पूर्ण करा.
अ) उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्षामधील बदल
उत्तर -
१) कालसुसंगत
२) उपयोग
३) आवश्यक
(आ) पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या
गोष्टी
उत्तर -
१) पक्ष्यांचा रंग
२) उडण्याची किंवा बसण्याची पद्धत
३) चोचींचा आकार
(इ) चोचीचे विविध उपयोग
उत्तर -
१) चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे.
२) बिया फोडणे.
३) शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणे.
४) घरटे बांधणे.
५) पिल्लांना भरवणे.
६) झाडावर किंवा वेलीवर लटकणे.
प्र. २. एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) चोचीचा वरचा भाग - मॅक्सिला
(आ) चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग - मॅन्डिबल
(इ) चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी - श्वसनेंद्रिये
(ई) 'एग टूथ' नसलेला पक्षी - किवी
प्र. ३. कोण ते लिहा.
(अ) 'अग्निपंख' हे नाव सार्थ करणारा पक्षी - फ्लेमिंगो
(आ) चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी - पोपट
(इ) शक्करखोरा' म्हणून ओळखले जाणारे पक्षी - शिंजीर
(ई) घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी - सुगरण किंवा बाया
प्र. ४. फरक लिहा.
किवी पक्षी
(i) एग टूथ नसतो.
(ii) पिले अंड्याचे पायांनी कवच फोडतात.
इतर पक्षी
(i) पिलांना एग टूथ असतो.
(ii) पिले एग टूथने अंड्याचे कवच फोडतात.
प्र. ५. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) 'चोचीचे आकार भक्षप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ.
उत्तर -चोचीचे आकार भक्षप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ खालील काही उदाहरणावरून स्पष्ट होतो. गरुड,. घार, ससाणा अशा शिकारी पक्ष्यांना सापापासून ते सशापर्यंत प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता यावी फाडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार, अणकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो. या उलट सुतार, हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते. त्यांना जमिनीवरचे किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात. तसेच चिमुकले शिंजीर अर्थात शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स फुलांमधला मधुरस चोखतात. त्यासाठी त्यांना शरीरापेक्षा लांब, बाकदार चोच असते. आकाराने चिमणीपेक्षाही लहान असलेला सनबर्ड एखादया फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला धक्काही न लावता, आपल्या पातळ, बाकदार, लांब चोचीनं फुलातला मध खातो. पोपट आपल्या जाडसर शिवाय बाकदार चोचीने पोपट शेंगा किंवा अगदी तिळाइतक्या लहान बिया आरामात फोडून खातो.उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच सरळसोट आणि टोकदार असते. कीटकांवर, विशेषत: माशांवर, उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूची चोचही त्याला उडता उडता माश्या, टोळ पकडायला सोपं जावं अशीच सरळ आणि लांब असते. यावरून चोचीचे आकार भक्षाप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ लक्षात येतो.
(आ) पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती. '
उत्तर - पक्षाच्या चोचीच्या सुरुवातीला दोन लहान छिद्र असतात त्यातूनच ते श्वासोच्छवास करतात पण किवी पक्ष्यांमध्ये ही छिद्र चोचीच्या टोकावर असतात. पक्षी अंड्यांमध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भागही येतो. त्याला 'एग टूथ' असे म्हणतात. अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात उगवतो. ह्याच दाताच्या मदतीनं पक्षी आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतो. सगळ्याच पक्ष्यांना हा एग टूथ असतो. अपवाद म्हणजे किवी पक्ष्याची पिल्ले. ही पिल्ले लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात. स्टॉर्कसारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात. चोचीचर, चोच आपटून ते जो आवाज करतात, त्याला वेगवेगळे अर्थ असतात.
(इ) ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो' या म्हणीचा अर्थ,
उत्तर - पक्षाच्या चोचपुराणाची माहिती घेतल्यावर एक गोष्ट लक्षात येते. निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जिवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही आयुधं हत्यारं दिली आहेत. पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. प्रत्येक पक्ष्याची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते, एक पक्षी जमिनीवरील किडे खातो, दुसरा कठीण कवचाची फळे खातो, तिसरा धान्य खातो, तर चौथा झाडाच्या सालीतील किडे खातो.खाणं बदलल्यामुळे यांच्या चोचीचे आकार, रचना बदललेली पाहायला मिळते.ही सर्व पक्ष्यांच्या चोचीची ही माहिती पाहता 'ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो' या म्हणीचा अर्थ लक्षात येतो.
प्र. ६. खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.
(अ) सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.
उत्तर - आरामात
(आ) बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.
उत्तर - अचूक
(इ) तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.
उत्तर - बारकाईने
(ई) घार आपली शिकार घट्ट पकडते.
उत्तर - घट्ट
प्र. ७. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.
पक्षी
(१) धनेश किंवा हॉर्नबिल - वैशिष्ट्यपूर्ण आकाराची चोच.
(२) फ्लेमिंगो - यांची चोच मध्येच वाकडी असते,यांची भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत वेगळी असते.
(३) गरुड, घार, ससाणा - घार, सापापासून सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. शिकार घट्ट पकडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून यांची चोच बाकदार व अणकुचीदार असते. यांच्या चोचीचा वरचा भाग थोडा लांब व वळलेला असतो.
(४) सुतार, हुप्पो - यांची चोच सरळसोट असते.हे जमिनीवरचे व झाडाच्या खोडात दडलेले किडे खाऊन पोट भरतात.
(५) शिंजीर (शक्करखोरा), सनबर्ड्स - यांची चोच बाकदार, पातळ व शरीरापेक्षा लांब असते. हे चिमणीपेक्षाही लहान असतात. फुलाच्या पाकळीवर बसून मध शोषून घेऊ शकतात.
(६) पोपट - यांची चोच जाडसर, बाकदार असते पोपट शेंगा, तिळाएवढ्या लहान बियासुद्धा सहज फोडून खातो.आणि डहाळ्यांवरून चालताना डहाळीला पकडण्यासाठी चोचीचा उपयोग करतो.
Nice of you to be a good guy to get your hands on the right hand and hand it all over again in marthi on Saturday morning
ReplyDeleteKhup chan aalashi hi kavita pathva madam plese
ReplyDelete