1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध......ध्वनी निर्माण होतो
उत्तर - कंपणामुळे
आ. ध्वनीची वारंवारिता मध्ये मोजतात.
उत्तर - हर्ट्झ
इ. ध्वनीचा आवाजही कमी होतो. कमी झाल्यास त्याचा
उत्तर - आयाम
ई. ध्वनीच्या..........साठी माध्यमाची आवश्यकता असते.
उत्तर - प्रसरणासाठी
2. योग्य जोड्या जुळवा.
'अ' गट
अ. बासरी - हवेतील कंपने
आ. वारंवारिता - Hz मध्ये मोजतात
इ. ध्वनीची पातळी - डेसिबेल
ई. श्राव्यातीत ध्वनी - वारंवारिता 20000 Hz पेक्षा जास्त
उ. अवश्राव्य ध्वनी - वारंवारिता 20Hz पेक्षा कमी
3. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. जुन्या काळी रेल्वे कधी येईल, हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत.
उत्तर -
१) रेल्वे जेव्हा धावत असते तेव्हा तिच्या चाकांचा आघात रुळांवर होतो
२) यामुळे कंपने निर्माण होतात
३) ही कंपने लांबपर्यंत रुळाच्या माध्यमातून आपण ऐकू शकतो
४) म्हणून रेल्वेच्या रुळांना कान लावून रेल्वे कधी येईल याचा अंदाज घेत असत.
आ. तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो.
उत्तर -
१) तबल्याच्या चामाड्यावर आपण आघात करतो यामुळे त्यात कंपने निर्माण होऊन आवाज येतो
२) तर सतारीमध्ये आपण ताणलेल्या तारा चेडल्यामुळे कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो.
३) वस्तू वेगवेगळया असल्यामुळे कंपनाची वारंवारीता आणि उच्चनीचता वेगवेगळी असते.
इ. चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली, तर त्याला ती ऐकू येणार नाही..
उत्तर -
१) ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
२) चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही. म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर त्याला ऐकू जाणार नाही.
ई. डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.
उत्तर -
१) डासाच्या पंखांची हालचाल एका सेकंदात 300 ते 600 एवढी असते. म्हणजेच पंखांच्या हालचालीची वारंवारिता 300 Hz ते 600 Hz इतकी असते.
२) त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो.
३) हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा असतो.
४) असा अवश्राव्य ध्वनी आपण ऐकू शकत नाही. म्हणून आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.
4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. ध्वनीची निर्मिती कशी होते ?
उत्तर -
१) एखाद्या वस्तूवर जेव्हा आघात होतो तेव्हा त्यामधून कंपने निर्माण होतात
२) या कंपनीला ध्वनी निर्मिती होते
आ. ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते ?
उत्तर -
आपल्या कानांना जाणवणारी ध्वनीची तीव्रता. ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ, आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते.
इ. दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा.
उत्तर -
1) दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारिता कमी होते. म्हणजेच लांबी वाढली की त्या दोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात.
2) दोलकाच्या वारंवारितेवर त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची वारंवारिता विशेष बदलत नाही, ती जवळ जवळ तेवढीच राहते.
ई. ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्चनीचता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते, ते स्पष्ट करा.
उत्तर -
1) तारेचा ताण वाढवला की वारंवारिता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि ध्वनी नीचतम असतो.
2) तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते, त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. तारेची लांबी वाढवली की वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी नीचतम असतो.